मतदान संथगतीने; दुपारपर्यंत सोलापूर जिल्ह्यात झाले ३३.१२ टक्के मतदान

By appasaheb.patil | Published: October 21, 2019 02:37 PM2019-10-21T14:37:31+5:302019-10-21T14:42:55+5:30

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. ...

Voting is slow; As of noon, 89 percent of the vote was registered in Solapur district | मतदान संथगतीने; दुपारपर्यंत सोलापूर जिल्ह्यात झाले ३३.१२ टक्के मतदान

मतदान संथगतीने; दुपारपर्यंत सोलापूर जिल्ह्यात झाले ३३.१२ टक्के मतदान

Next
ठळक मुद्दे- विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू- बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांनी लावल्या रांगाच रांगा- दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.

११ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी सात वाजता प्रारंभ झाला़ सततधार पावसामुळे सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी कमी प्रमाणात होती़ मात्र अकरा वाजण्याच्या सुमारास पाऊस थांबला अन ् मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाले. दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल असा विश्वास जिल्हा निवडणुक कार्यालयाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात 
किती टक्के झाले मतदान पहा...

  • करमाळा - २८.०२
  • माढा - ३३.३४
  • बार्शी - ३०.४३
  • मोहोळ - २९.४५
  • सोलापूर शहर उत्तर - २३.६३
  • सोलापूर शहर मध्य - २४.१२
  • अक्कलकोट - २७.०५
  • सोलापूर दक्षिण - २४.०७
  • पंढरपूर - २६.५४
  • सांगोला - ३२.५६
  • माळशिरस - ३३.१२

Web Title: Voting is slow; As of noon, 89 percent of the vote was registered in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.