ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान; मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना
By शीतलकुमार कांबळे | Published: November 4, 2023 12:41 PM2023-11-04T12:41:29+5:302023-11-04T12:42:20+5:30
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता.
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी रविवार ५ नोव्हेंबर रोजी मददान होत असून यासाठी ६९० कर्मचारी नेमले आहेत.
दरम्यान, जालिहाळ, लक्ष्मीदहीवडी, आंधळगांव, रड्डे, पडोळकरवाडी आदी गावे संवेदनशील असल्यामुळे येथे पोलिसांची जादा कुमक नेमण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत .निवडणूक प्रकियेसाठी सर्व प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवेढा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक व एका ग्रामपंचायत मध्ये पोट निवडणूकीचा समावेश आहे. तालुक्यातील ब्रम्हपुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ९४ केंद्रावरती मतदान होणार असून त्यासाठी ११५ मतदान पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई तसेच राखीव पथकातील कर्मचारी असे एकूण ६९० कर्मचार्यांचा समावेश आहे. ही निवडणूक प्रक्रिया तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, सोमनाथ साळुंखे,संदीप हाडगे आदी पार पाडत आहेत.