अकरा कागदपत्रांच्या आधारे मिळणार मतदानाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:20 AM2021-04-15T04:20:54+5:302021-04-15T04:20:54+5:30

मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट कार्यालयाने जारी केलेले छायाचित्र असलेले ...

Voting will be based on eleven documents | अकरा कागदपत्रांच्या आधारे मिळणार मतदानाची संधी

अकरा कागदपत्रांच्या आधारे मिळणार मतदानाची संधी

Next

मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट कार्यालयाने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित केलेले विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे नोंदणी महानिबंधकांनी निर्गमित केलेले स्मार्ट कार्ड, फोटो असलेले निवृत्ती वेतनविषयक कागदपत्र, केंद्र, राज्य, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी छायाचित्रासह निर्गमित केलेले कार्यालयीन ओळखपत्र, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना निर्गमित केलेले कार्यालयीन ओळखपत्र, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट यापैकी कोणतेही एक कागदपत्राच्या पुराव्याच्या आधारे मतदान करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानादिवशी आणि त्याअगोदरच्या दिवशी उमेदवारांना मुद्रित माध्यमातून जाहिरात द्यायची असेल तर ती प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. अशा जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीमार्फत प्रामाणित करून प्रकाशित करावी. त्यासाठी संबंधित समितीकडे विहित नमुन्यात जाहिरातीच्या डिझाईनसह वेळेत सादर करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Voting will be based on eleven documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.