वाघोलीत पाण्यासाठी वणवण; आठ दिवसापुरताच पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:19+5:302021-05-26T04:23:19+5:30
कामती : मोहोळ तालुक्यातील वाघोली-वाघोलीवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा होणारा पाझर तलाव कोरडा पडला आहे. त्यात ...
कामती : मोहोळ तालुक्यातील वाघोली-वाघोलीवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा होणारा पाझर तलाव कोरडा पडला आहे. त्यात आता केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उजनी कॅनॉल जवळूनच जातो; परंतु त्याद्वारे पाणी सोडले जात नाही. या कॅनॉलमधून तलावात पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
या पाझर तलावावर जनावरे, नागरिक तसेच शेजारी असणारे शेतकरी अवलंबून आहेत. वन्यप्राण्यांची तहानसुद्धा याच तलावावर भागते. सध्या हा तलाव कोरडा पडल्याने या सर्वांचा घसा कोरडा पडणार आहे. मंगळवेढा - सोलापूर महामार्गालगत असणारा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा तलाव भरला जातो, मग गावाला पाणीपुरवठा होणारा पाझर तलाव का भरला जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
---
पाणी सोडण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असता, टोलवा-टोलवीची उत्तरे मिळतात. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या तलावात पाणी सोडले जाते. या तलावाचा गावाला पाण्यासाठी वापर होत नाही. पाण्यासाठी गावातील पाझर तलावात पाणी सोडावे लागेल.
- ऊर्मिला वाघमारे, सरपंच, ग्रा. पं. वाघोली-वाघोलीवाडी
---
फोटो : २३ कामती
ओळ - कामती येथील महिलांंना शेतातील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
----