बळिराजाला ‘वळीवा’ची प्रतिक्षा अन् धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:09+5:302021-05-11T04:23:09+5:30
पावसाच्या आगमनावर कृषी व्यवसायाची मोठी भिस्त आहे. वेळेवर पाऊस पडला तर साहाजिकच उत्पादन वाढते. त्यामुळे बळिराजाला मान्सूनपूर्व पडणाऱ्या वळवाच्या ...
पावसाच्या आगमनावर कृषी व्यवसायाची मोठी भिस्त आहे. वेळेवर पाऊस पडला तर साहाजिकच उत्पादन वाढते. त्यामुळे बळिराजाला मान्सूनपूर्व पडणाऱ्या वळवाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला हा पाऊस वाऱ्यामुळे झाडं, पिकं झोपवतो, गारपीट होते. विजा पाडून बळीसुद्धा घेतो. त्यामुळे वळवाच्या पावसाची शेतकऱ्याला प्रतीक्षा असली तरीही धास्ती मात्र कायम आहे.
थोडी खुशी, थोडा गम
रोहिणी नक्षत्रापूर्वीच्या टप्प्यात अवकाळी म्हणजेच ‘वळीव’ हा पाऊस बेधुंद, बेफाम, कमी वेळेत पडणारा तर कधी-कधी वर्षभर पुरेल एवढं पाणी देऊन जातो. कोणत्याही दिशेने, वाकडा, तिरका, चौखूर उधळत येणाऱ्या पावसासाठी उन्हाळ्यापूर्वी नांगरटी करून ठेवलेल्या जमिनी मात्र या पावसाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या असतात. या तापलेल्या शिवारात पावसाचे आगमन होताच विशिष्ट गंधाची दरवळ मन मोहून टाकणारी असते. अशा अवकाळी पावसामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना मोठं नुकसानही सोसावं लागतं. सहाजिकच या पावसामुळे ‘थोडी खुशी, थोडा गम’ दिसून येतो.
कोट
::::::::::::::::
वळवाचा चांगला पाऊस पडला तर पाणी पातळीही वाढते, तापलेल्या जमिनींची पाण्याची भूक भागते. त्यामुळे पुढल्या काळात कमी जास्ती पाऊस पडला तरीही शेतातील पिके हाती लागतात. मात्र, या पावसाबरोबर गारा व वादळाने शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या पावसाची धास्ती लागून राहते.
- देवीदास ढोपे
पुरंदावडे
फोटो ::::::::::::::::::::::::::
ग्रामीण भागात दिसणारी वावटळ