साडेतेरा हजार रुग्ण किडणी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत, तात्याराव लहाने यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:34 PM2018-07-28T12:34:03+5:302018-07-28T12:36:26+5:30

 प्रिसिजनच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायलिसीस युनिटचे लोकार्पण, तीन युनिट कार्यान्वित

Waiting for a thousand and a thousand patients for kidney transplant, Tatyarao Lahane's information | साडेतेरा हजार रुग्ण किडणी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत, तात्याराव लहाने यांची माहिती

साडेतेरा हजार रुग्ण किडणी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत, तात्याराव लहाने यांची माहिती

Next
ठळक मुद्देप्रिसिजन कंपनीच्या सीएसआर फं डातून दोन डायलिसीससमाजाचे ऋण फेडण्यासाठीच सीएसआर फंडातून १०५ शाळांमध्ये लर्निंग कीट

सोलापूर : राज्यात किडणीच्या आजाराने अनेक जण त्रस्त आहेत़ दीड लाख रुग्णांना रोज डायलिसीस करावे लागते़ सुमारे साडेतेरा हजार रुग्णांना किडणी बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर किडणीचे आजार संभवणार नाहीत, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक आणि प्रख्यात नेत्र शल्यविशारद डॉ़ तात्याराव लहाने यांनी सोलापुरात बोलताना दिली.

सोलापुरातील प्रिसिजन कॅमशाफ्ट्स आणि डॉ़ वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या डायलिसीस युनिटचा लोकार्पण सोहळा डॉ़ लहाने यांच्या उपस्थितीत पार पडला़ सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालयाच्या ‘ए’ ब्लॉकमध्ये हा सोहळा संपन्न झाला़ अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ सुनील घाटे होते़ तर प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ़ सुहासिनी शहा, लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ राजाराम पोवार यांची विशेष उपस्थिती होती़ माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ़ प्रमोद कुलकर्णी आणि मेडिसीन विभाग प्रमुख डॉ़ एच़ बी़ प्रसाद यांची व्यासपीठावर उपस्थिती होती

यावेळी बोलताना डॉ़ सुहासिनी शहा म्हणाल्या, प्रिसिजन कंपनीच्या सीएसआर फं डातून दोन डायलिसीस युनिटसाठी तरतूद करण्यात आली आहे़ या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी म्हणून मला ही जनसेवेची संधी मिळाली़ यंदा दोन युनिट दिले असून पुढील वर्षी आणखी दोन युनिट देणार असल्याचे त्यांनी सांगितले़ समाजाचे ऋण फेडण्यासाठीच सीएसआर फंडातून १०५ शाळांमध्ये लर्निंग कीट देऊन शिक्षकांना त्याचे प्रशिक्षणही दिले आहे़ 

डॉ़ सुनील घाटे म्हणाले, सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात डायलिसीस सुविधा नव्हती़ त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती़ या रुग्णालयाच्या माजी विद्यार्थिनी डॉ़ सुहासिनी शहा त्यासाठी पुढे आल्या़ माजी विद्यार्थी संघटनेने आर्थिक योगदान दिले़ परिचारक संघटनेसह अनेक सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी डायलिसीस युनिट उभे करण्यासाठी पुढाकार घेतला़ त्यामुळेच या सुविधा देता आल्या़ रुग्णालयात १५० परिचारकांच्या जागा रिक्त आहेत़ सीईटी परीक्षा झाली असून तातडीने जागा भराव्यात, अशी मागणी डॉ़ घाटे यांनी केली़ 

यावेळी डॉ़ प्रमोद कुलकर्णी यांनी अधिष्ठाता डॉ़ सुनील घाटे यांनी केलेल्या आवाहनास माजी विद्यार्थी संघटनेने प्रतिसाद दिल्याचे सांगितले़ ते म्हणाले, गेल्या ५५ वर्षात वैशंपायन महाविद्यालयातून पाच हजार विद्यार्थी डॉक्टर होऊन बाहेर पडले़ परंतु रुग्णालयात डायलिसीस सुविधा नसल्याची खंत सर्वांनाच होती़ त्यातूनच ही कल्पना पुढे आली़

सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले़ आभार डॉ़ एच़ बी़ प्रसाद यांनी मानले़ यावेळी प्रिसिजनचे व्यवसाय विकासक करण शहा, मयुरा शहा, डॉ़ मंजिरी चितळे, डॉ़ सुमन सरदेसाई, डॉ़ वासंती मुनोत, डॉ़ के. पी़ डागा, अश्विनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ़ माधवी रायते, डॉ़ वासुदेव रायते, न्यूरो सर्जन डॉ़ शिरीष वळसंगकर, डॉ़ गिरीश चंडक, डॉ़ उमा प्रधान, डॉ़ सुहास छंचुरे, डॉ़ विठ्ठल धडके, डॉ़ संदीप होळकर, डॉ़ एम़ ए़ जमादार, डॉ़ शुभांगी धडके, डॉ़ इंगळे, डॉ़ गाडगीळ, डॉ़ मुंढेवाडी, डॉ़ मुकुंद रॉय, डॉ़ कासलीवाल, डॉ़ अगरवाल, डॉ़ आडके, डॉ़ सुनील वैद्य,  माजी आमदार धनाजी साठे, दत्ता  ताठे, उद्योजक सतीश मालू,  चव्हाण उद्योग समूहाचे शिवप्रकाश चव्हाण यांच्यासह निवासी डॉक्टर आणि परिचारिका उपस्थित होत्या़ 

सीएसआर फंडाचा असाही उपयोग 
च्अनेक क ार्पोरेट कंपन्या सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटी) फंडाचा वापर कंपनीला साहाय्यभूत ठरणाºया घटकास किंवा वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी खर्च करतात़ सोलापूरच्या प्रिसिजन कॅमशाफ्ट्स कंपनीने या सीएसआर फंडाचा उपयोग सामाजिक ऋण फेडण्यासाठी केला आहे़ हा देशातील वेगळा आदर्श ठरेल, असे गौरवोद्गार डॉ़ तात्याराव लहाने यांनी काढले़ जे़ जे़ रुग्णालयाच्या नेत्र विभागातील नादुरुस्त मशीन्ससाठी लाखो रुपयांची शहा दाम्पत्यांनी मदत केल्याने आज शेकडो रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याचे डॉ़ लहाने यांनी सांगितले़ 

यांनी दिले योगदान
च्शासकीय रुग्णालयात ए ब्लॉकमध्ये स्वतंत्र डायलिसीस युनिटची निर्मिती करण्यात आली आहे़ दहा युनिट क्षमतेच्या या विभागासाठी प्रिसिजन कॅमशाफ्ट्स कंपनीने ३५ लाख रुपये खर्चून दोन डायलिसीस युनिट दिले आहेत़ माजी विद्यार्थी संघटनेने एक युनिटचा खर्च उचलला आहे़ परिचारिका संघटनेच्या वतीने १ लाख ३१ हजार, डॉ़ मुकुंद रॉय यांनी २५ हजार अशा अनेकांनी या युनिटसाठी देणगी दिली़ 

शासनाकडून सहा डायलिसीस युनिट 
च्सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात महाराष्ट्र, कर्नाटकातील रुग्णांची संख्या अधिक आहे़ या रुग्णालयात आतापर्यंत डायलिसीस सुविधा नव्हती़ प्रिसिजन कं पनीने ही गरज भागवली आहे़ राज्य शासनाकडून या रुग्णालयासाठी विशेष बाब म्हणून सहा डायलिसीस युनिट मंजूर केले जातील़ त्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना सहसंचालक डॉ़ लहाने यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ सुनील घाटे यांना केल्या़ 

Web Title: Waiting for a thousand and a thousand patients for kidney transplant, Tatyarao Lahane's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.