एक घागर पाण्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 03:03 PM2019-05-30T15:03:09+5:302019-05-30T15:06:29+5:30

मोहोळ तालुक्यातील नरखेड गावातील दुष्काळी कहाणी; पाण्याअभावी विहिर, बोअर पडले कोरडे

Waiting for three hours for a swimmer | एक घागर पाण्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा

एक घागर पाण्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देवैराग रोडवर मोहोळपासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे नरखेड हे गावभोगावती नदी गेल्या सहा महिन्यांपासून व सीना नदी महिन्यापासून कोरडी जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्यामुळे ४०० फुटांपर्यंत बोअर घेतले तरी ते कोरडे जात असल्याने गावकरी आणि शेतकरी हतबल

हणमंत पवार 

नरखेड : वैराग रोडवर मोहोळपासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे नरखेड हे गाव. गावात मोठ्या वाड्या-वस्त्या. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी भोगावती नदीमध्ये दोन विहिरी, ग्रामपंचायत कार्यालयालगत विहीर, सीना नदीवरून दोन गावांतर्गत पाईपलाईन, गावामध्ये पाण्याचे ४ आड, ४ हातपंप, १०-१२ बोअर एवढी साधने असूनही फक्त ग्रामपंचायत कार्यालयातील बोअर आणि सीना नदीवरील संगमावरून केलेली पाईपलाईन हा पर्याय वगळला तर गावातील विहिरी, बोअर आटले आहेत.

ग्रामपंचायतीचे सर्वच बोअर बंद पडले आहेत. सिद्धेश्वर मंदिरासमोरील बोअरला तुटक-तुटक पाणी येत असल्याने हा आधारही कधी बंद पडेल, याचा भरवसा राहिलेला नाही.

ज्वारी हे मुख्य पीक गावकरी घेतात, मात्र पाण्याअभावी उत्पादन घटले आहे. ज्वारीव्यतिरिक्त इतर पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. भोगावती नदी गेल्या सहा महिन्यांपासून व सीना नदी महिन्यापासून कोरडी आहे. जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्यामुळे ४०० फुटांपर्यंत बोअर घेतले तरी ते कोरडे जात असल्याने गावकरी आणि शेतकरी हतबल झाले आहेत. 

गावाशेजारील अनेक वाड्यावस्त्यांवर बोअर, विहिरी आहेत. त्याही २० ते २५ मिनिटांपुढे चालत नाहीत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय आहे. गावात ४-५ दूध डेअºया आहेत, परंतु पाणीटंचाईमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. दुपारच्या तीव्र उन्हामध्येसुद्धा पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनावरांच्या खाद्याचे भाव वाढल्याने दुधाचा व्यवसायही तोट्यात आल्याने गावकºयामंध्ये नैराश्य दिसत आहे. नरखेड भागासह गावात चारा छावणीची मागणी करूनसुद्धा मंजूर झाली नाही.

या संकटाच्या दिवसात गावातील बागायतदार बांधव स्वत:च्या पीकशेतीला पाणी न देता तेच पाणी गावाला देत आहेत. सोसायटी चेअरमन जयवंत पाटील, काकासाहेब पाटील, गौरीहर भडंगे, पांडुरंग शेंडगे, वसंत भडंगे, हरिदास मोटे, सुनील भडंगे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. काही बोअरमालकांनीही सहकार्याचा हात गावासाठी पुढे केला आहे. नरखेडसह मसले चौधरी, देगाव येथे सर्वात जास्त पाणीटंचाई असून त्या खालोखाल डिकसळ, भोयरे, एकुरके, बोपले, मलिकपेठ, हिंगणी, भांबेवाडी, यलमवाडी आदी भागातील वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई भासत आहे.

पाणी मिळविण्यासाठी अख्या गावात जणू स्पर्धाच..
- या गावाला भेट दिली तेव्हा ग्रामपंचायतीसमोरील बोअरवर प्रचंड गर्दी दिसली. दोन घागरीसाठी व्यवसाय-कामधंदा सोडून नंबर लावून दिवसभर रांगेत असलेले गावकरी दिसले. ते म्हणाले, फक्त दोन घागरीसाठी दिवसभर रांगेत ३ तास उभे राहावे लागत आहे. संगमावरील सीना नदीवर पाण्यासाठी खड्डा खोदून नवीन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दोन टँकरद्वारे गावात पाणी येते. ते विहिरीमध्ये सोडले जाते. तेथून पाईपलाईनने गावाला येते. ते मिळविण्यासाठी अख्या गावात जणू स्पर्धा असते. 

गावातील सर्व विहिरी कोरड्या पडल्याने आम्ही सीना नदीवरील संगमातून नवीन पाईपलाईन केली आहे, तर दोन टँकर व काही बोअरच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- उमेश पाटील, जि. प. सदस्य 

सीना नदीवरील घाटणे बॅरेज ५ ते ७ मीटरने अडविल्यास व गावातील पाण्याचे नियोजन केल्यास नरखेडसह भागातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी सीना-भोगावती जोडकालवा होणे गरजेचे आहे. 
- शहाजी मोटे, माजी सरपंच

ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या वतीने मोठा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु दुष्काळ, पाणीटंचाई व नियोजनाअभावी पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत.
- सुधाकर काशिद गुरुजी, 
अंनिस कार्यकर्ते 

नरखेडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून दोन टँकरला मंजुरी मिळाली आहे. नवीन पाईपलाईन व काही बोअरच्या आणि गावाशेजारील शेतकºयांच्या खासगी बोअरच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे.
-तात्यासाहेब नाईकनवरे, ग्रामसेवक

Web Title: Waiting for three hours for a swimmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.