कुर्डूवाडीत स्पीडोमीटर अँपद्वारे पार पडल्या वॉक फॉर हेल्थ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:23+5:302020-12-06T04:24:23+5:30
३ कि.मी.५ व १०कि.मी अंतराच्या १६ वर्षे वयोगटावरील व वयोगटाखालील अशा दोन्ही गटातील स्पर्धेसाठी स्पीडोमीटर ॲपद्वारे या स्पर्धा घेण्यात ...
३ कि.मी.५ व १०कि.मी अंतराच्या १६ वर्षे वयोगटावरील व वयोगटाखालील अशा दोन्ही गटातील स्पर्धेसाठी स्पीडोमीटर ॲपद्वारे या स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमात १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान पहिल्यांदा सराव सत्र घेण्यात आले. तालुक्यातूनच नव्हे तर देश विदेशातल्या स्पर्धकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत १९४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. डॉ.जयंत करंदीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे, संस्थेचे अध्यक्ष अमोल सुरवसे उपस्थित होते.
--
या विजेत्यांचा झाला गौरव
३किमी-१६ वर्षे खालील गट-ओम देवकर( प्रथम), अपेक्षा आसबे (द्वितीय), मिहिर बैरागी ( तृतीय), १६ वर्षांच्या पुढील गटात -प्रज्ञा कन्हेरे (प्रथम), नीलेश देशमुख (द्वितीय), रामचंद्र खारे (तृतीय), ५ किलोमीटर-१६ वर्षांखालील वयोगट- अभिषेक वाघ (प्रथम), अंतरा पोळ (द्वितीय), शिवराज लोंढे (तृतीय), १६ वर्षांवरील वयोगट - जयवंत भोरे (प्रथम), शरद लोंढे (द्वितीय), धनंजय कुणाळे (तृतीय), १० किलोमीटर-१६ वर्षांखालील वयोगट: ऋषिकेश करळे (प्रथम), करण सुरवसे(द्वितीय), ओंकार जाधव (तृतीय), १६वर्षांवरील वयोगट - उमेश पाटील, सारंग पाटील (प्रथम), नितीन मराठे (द्वितीय), शंकर चव्हाण (तृतीय), ज्येष्ठ नागरिक पारितोषिके-तुकाराम शिंदे (प्रथम), सगजान कांबळे (द्वितीय), शारदा बांगर (तृतीय) असे आहेत.
---
फोटो : ०५ आदर्श स्कूल
कुर्डूवाडीत स्पीडोमीटर अँपद्वारे पार पडलेल्या वॉक फॉर हेल्थ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना डॉ. जयंत करंदीकर, अमोल सुरवसे, पूजा सुरवसे.