कावडीसोबत पदयात्रा ते टेम्पोतून पालखीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:22+5:302021-04-19T04:20:22+5:30
कोरोनामुळे भाविकांची संख्याही कमालीची रोडावल्याचे दिसून आले. मंद्रुप येथील भाविक दरवर्षी गुढीपाडव्याला श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रेसाठी पदयात्रेने जातात. मंद्रुप ते ...
कोरोनामुळे भाविकांची संख्याही कमालीची रोडावल्याचे दिसून आले.
मंद्रुप येथील भाविक दरवर्षी गुढीपाडव्याला श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रेसाठी पदयात्रेने जातात. मंद्रुप ते श्रीशैल या ६०० किमी अंतरासाठी त्यांना २६ दिवस लागत होते. यंदा पदयात्रेऐवजी पालखी टेम्पोमध्ये ठेवून भाविकांनी स्वतःही वाहनातून प्रवास केला. दररोज १५० किमी अंतर पार करताना वाटेत नित्य पूजा-अर्चा, प्रसाद आदी उपक्रम करीत चौथ्या दिवशी श्रीशैलमध्ये यात्रा पोहोचली. श्रीशैलचा डोंगर मात्र या भाविकांनी पायी चालत पार केला. चार दिवस दासोह चालवून यात्रा दोनच दिवसांत मंद्रुपमध्ये पोहोचली. यात्रेत कोरोनामुळे अवघे ९० भाविक सहभागी झाले होते. सदाशिव जोडमोटे यांनी सुरू केलेली कावडीसोबत १४ वर्षे पदयात्रा चालली. त्यानंतर, गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी ३५ वर्षे तीच परंपरा चालवत पदयात्रा केली. भाविकांच्या संख्येतही घटच होत राहिली. यंदा यात्रेत करबसय्या स्वामी, सुरेशकुमार स्वामी, इरेश स्वामी, गुरुनाथ जोडमोटे, शांतय्या स्वामी, प्रवीण नडविनअंगळ, शंकर म्हेत्रे गुरुजी आदी सहभागी झाले होते.
थेट मंदिर प्रवेश अन प्रदक्षिणा
मंद्रुपच्या पालखीला श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात थेट प्रवेशाचा मान आहे. विधिवत पूजा-अर्चा, प्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिर प्रदक्षिणाही नेहमीप्रमाणे विनाअडथळा करता आली, अशी माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी दिली.
फोटो
१८मंद्रुप०१
ओळी
मंद्रुप ते श्रीशैल पालखी सोहळा परतीनंतर समारोपप्रसंगी संयोजक गुरुसिद्ध म्हेत्रे आणि भाविक.