वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 08:29 PM2019-08-22T20:29:36+5:302019-08-22T20:35:30+5:30

पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.

Wangikar's labor force started off hand pumps and wells increased water level | वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी

वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी

Next
ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाहीमागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होतीगतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही

अरुण बारसकर

बीबीदारफळ : खळखळण्यासारखा पाऊस पडला नाही म्हणून वांगीरा ओढाही वाहिला नाही. पाण्याचा दुष्काळ पडल्याची जाणीव झाली अन् वांगीकर टिकाव, फावडे, घमेले घेऊन कामाला लागले. केलेल्या कामाचे बक्षीस तर मिळालेच शिवाय जेमतेम पावसामुळे बंद हातपंप सुरू झाले व विहिरींची पाणीपातळीही वाढली.

उत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाही. कारण पुरेसा पाऊस पडलेला नाही. मागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अन्य गावांप्रमाणे वांगी गावातही पाण्याची स्थिती. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही. यामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली. काही तरी केले पाहिजे हा विचार सुरू असताना सत्यमेव जयते पानी फाउंडेशनच्या कामाची चर्चा सुरू झाली. कारण शेजारच्या भागाईवाडी, वडाळा व इतर गावांच्या एकजुटीने होणारा गावाचा विकास वांगीकरांना दिसत होता.

वांगीतील काही युवक-महिला प्रशिक्षण घेऊन आले. प्रशिक्षणात गावकºयांच्या श्रमदानातून सरकारच्या कामातून गाव बदलतंय ही धारणा झालेली. आपणही वांगीरा ओढ्याचा फायदा घ्यायचा या ईर्षेने प्रशिक्षणाला गेलेले तरुण पेटले होते. त्यांनी २०-२५ गावकºयांना सोबत घेत ८ एप्रिलला कामाचा श्रीगणेशा केला. पानी फाउंडेशनचे प्रशिक्षित पाणी अडविण्याची शास्त्रोक्त पद्धत सांगत असत. कसा तरी एप्रिल महिना सरला व मे महिना सुरू झाला. 

गावाच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडले. ५०० फूट खोलीचे बोअरही बंद झाले तर ७०० फूट खोलीचा एखादा बोअर उचक्या देत कधी-कधी पाणी फेकू लागला. हे चित्र आपणच बदलू शकतो, ही पक्की धारणा झालेले गावकरी जोमाने कामाला लागले. शासनाची कामे, गावकºयांचे श्रमदान, सामाजिक संस्था व कंपन्यांनीही हातभार लावल्याने पाणी अडविण्याची कामे झाली.

शोषखड्ड्यांचा झाला फायदा
- पावसाळा सुरू झाला अन् वांगी परिसरात रिमझिम पाऊस पडू लागला. शेतात पाणी अडविण्याची तर गावात शोषखड्ड्याची कामे झाली. तीन-चार पाऊस बºयापैकी पडला व पाणी थळथळले. जमिनीत पाणी मुरले व जिरलेही. 
- शोषखड्ड्यामुळे गावातील बंद पडलेले पाच हातपंप सुरू झाले तर पाणीपुरवठा बोअरचे पाणी वरती आले आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींनाही आता पाणी आले आहे. वांगीरा ओढ्यालगतच्या विहिरीत तर पाण्यात चांगली वाढ झाली आहे.

या वर्षी २२९ मि.मी. पाऊस पडला आहे. पडलेल्या पावसाचा फायदा पाणीपातळी वाढण्यासाठी झाला आहे. आणखीन चांगला पाऊस पडला तर दुष्काळ हटेल. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.
- किसन गायकवाड 
वॉटर कप प्रशिक्षणार्थी

Web Title: Wangikar's labor force started off hand pumps and wells increased water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.