पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत हवा ? मग या योजनेची माहिती जाणून घ्या
By Appasaheb.patil | Published: September 27, 2022 04:17 PM2022-09-27T16:17:05+5:302022-09-27T16:17:12+5:30
गरिबांना आर्थिक आधार: दुर्धर आजारावर मोफत उपचार
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांच्या माध्यमातून दुर्धर आजारांवर मात करण्यासाठी गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत दिली जाते. गेल्या आठ महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील २४ हजार ८५६ रुग्णांना ६० कोटी ३१ लाख ९ हजार ४१३ रुपयांची मदत मिळाली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांसाठी प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाखापर्यंत विमा संरक्षण (मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख) तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अतिरिक्त २१३ उपचारांसह एकूण १ हजार २०९ उपचारांकरिता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ५ लाखांपर्यंत वैद्यकीय संरक्षण दिले जाते.
----------
जिल्ह्यातील ४८ रुग्णालयात घेता येतात मोफत उपचार
जिल्ह्यातील ४८ रुग्णालयात सेवा आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ४६ रुग्णालयात या आरोग्य विमा रुग्णालयाचा लाभ घेता येतो.
----------
कोणाला मिळतो योजनेचा लाभ...
महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना
- पिवळे, केशरी, अंत्योदय व इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबे, अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका व सात-बारा उताराधारक शेतकरी कुटुंबे, लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र आवश्यक.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा असा घ्या लाभ
- सामाजिक, आर्थिक जातनिहाय जनगणनेत नोेंदीत ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबे, आयुष्यमान कार्ड (ई-कार्ड) व फोटो ओळखपत्र आवश्यक, ई-कार्ड काढण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्या.
-----------
असा घ्या उपचार
- - उपचारासाठी योजनेच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्राला भेटा
- - आरोग्य मित्राकडून योजनेविषयी संपूर्ण मार्गदर्शन ऐका.
- - डॉक्टरांचे मार्गदर्शन व आवश्यक त्या चाचण्या करा
- - ठरलेल्या वेळेत पात्र रुग्णांवर डॉक्टरांचे उपचार होतात
- - उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी व परतीच्या प्रवासाची रक्कम मिळते
--------
आर्थिक परिस्थिती नसतानाही उपचार करता येत असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे एका कुटुंबाला वर्षाकाठी आजारावर खर्च करण्यासाठी पाच लाखांपर्यंत लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळतो. या योजनेतून उपचार करून घेण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले योजनेचाही अनेक लोक लाभ घेतात.
- डॉ. रवि भोपळे, जिल्हा समन्वयक, आरोग्य योजना, सोलापूर
----------
१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२
- लाभ घेतलेले रुग्ण - २४ हजार १९०,
- झालेला मोफत उपचार खर्च - ६० कोटी ३१ लाख १० हजार
१ एप्रिल २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२
- लाभ घेतलेले रुग्ण - ११ हजार २०४,
- झालेला मोफत उपचार खर्च - २८ कोटी ४५ लाख ७३ हजार