वर्धा कुक्कुटपालन संस्थेची राज्य सहकार महर्षी पुरस्कारासाठी निवड, सहकारसंस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची सोलापूरात घोषणा

By Admin | Published: April 15, 2017 06:19 PM2017-04-15T18:19:00+5:302017-04-15T18:41:03+5:30

.

Wardha Poultry Association's State Co-op for Maharishi Award, Sahakar Sangstan's award to Solapur anniversary | वर्धा कुक्कुटपालन संस्थेची राज्य सहकार महर्षी पुरस्कारासाठी निवड, सहकारसंस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची सोलापूरात घोषणा

वर्धा कुक्कुटपालन संस्थेची राज्य सहकार महर्षी पुरस्कारासाठी निवड, सहकारसंस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची सोलापूरात घोषणा

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत सोलापूर
ंसोलापूर दि १५ : सहकार महर्षी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन संस्थेची निवड झाली. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
सहकार भूषण व सहकारनिष्ठ पुरस्काराने राज्यातील सहकारी संस्थांचा गौरव राज्यपाल विद्यासागर राव, विधानभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. याचे वितरण २६ एप्रिल रोजी सोलापुरात होणार आहे. राज्यपातळीवरील सहकार महर्षी हा पुरस्कार एक लाख रुपये देऊन तर सहकार भूषण पुरस्कार ५१ हजार रुपये देऊन गौरविले जाईल. सहकारनिष्ठ पुरस्कारासाठी २५ हजार रुपये दिले जाणार आहेत.
राज्यभरातून १३३ संस्थांचे प्रस्ताव सहकार खात्याकडे आले होते. त्यातून निवड समितीने छाननी करुन प्रस्ताव पुरस्कारासाठी पात्र ठरले असल्याचे सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितले. सहकार महर्षी या प्रथम पुरस्कारासाठी वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन सहकारी संस्थेची निवड झाली असून एक लाख रुपये रोख व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थामधून सहकार भूषण पुरकार वसंत सर्व सेवा सहकारी सोसायटी म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली (पुणे विभाग), निफाड विकास सोसायटी नाशिक(नाशिक विभाग), नेरापिंगळाई विकास सहकारी सोसायटी ता. मोर्शी, जि.अमरावती (अमरावती विभाग), सहकारनिष्ठ पुरस्कार अंधारी विकास सोसायटी सिल्लोड, औरंगाबाद (औरंगाबाद विभाग), लांजे पंचक्रोशी विकास संस्था लांजा, रत्नागिरी(कोकण विभाग), तळोली विकास सोसायटी नागभीड, चंद्रपूर (नागपूर विभाग) यांना देण्यात येणार आहेत.
नागरी पतसंस्था, ग्राणीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकरांच्या संस्थांसाठीच्या सहकार भूषण पुरस्कारासाठी ज्ञानदीप सहकारी पतसंस्था अरुणोदयनगर, मुलुंड, पुर्व, मुंबई (कोकण विभाग), धन्वंतरी नागरी पतसंस्था सातारा (पुणे विभाग), भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक पतसंस्था, उस्मानाबाद(औरंगाबाद विभाग), सहकार निष्ठ पुरस्कार साईसेवा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था काष्टी, श्रीगोंदा(नाशिक विभाग), प्रियदर्शनी नागरी पतसंस्था नांदुरा, जि.बुलडाणा(अमरावती विभाग), गिरनार अर्बन क्रेडीट सोसायटी नागपूर (नागपूर विभाग) यांची निवड केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिला जाणार सहकार भूषण पुरस्कार पुणे विभागातील पुणे जिल्हा बँकेला तर सहकार निष्ठ पुरस्कार औरंगाबाद विभागातून लातूर जिल्हा बँकेला, कोकण विभागातून रत्नागिरी जिल्हा बँकेला जाहीर झाले आहेत.
नागरी सहकारी बँकासाठी दिला जाणारा सहकार भूषण पुरस्कार म्युनिसिपल को-आॅप.बँक मुंबई व विदर्भ मर्चंट को-आॅप बँक हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांना तर सहकार निष्ठ पुरस्कार अभिनंदन अर्बन को-आॅप बँक मर्या. अमरावती व दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँक आटपाडी, जि. सांगली यांना दिले जाणार आहेत. सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरणी व सहकारी दूध संघासाठी दिलेजाणारे सहकार भूषण पुरस्कार पुणे विभागातील पांडूरंग साखर कारखाना श्रीपूर, सोलापूर, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ(गोकुळ), हुतात्मा स्वामी वारके सहकारी सुतगिरणी मुदाळ, ता. भुदरगड, जि.कोल्हापूर यांना तरसहकार निष्ठ पुरस्कार औरंगाबाद विभागातील रेणा सहकारी साखर कारखाना लि. दिलीपनगर, निवाडा, जिल्हा लातूर, विकास साखर कारखाना लातूर व नाशिक विभागातील संगमेश्वर तालुका दूध उत्पादक संघ संगमनेर, जि. नगर यांना दिले जाणार आहेत.
गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठीचे सहकार भूषण पुरस्कार कोकण विभागातील मॅराथॉन कॉसमॉस को-आप हौसींग सोसायटी मुलुंड, मुंबई, दि. योगानंद को. आॅपरेटीव्ह हौसींग सोसायटी बोरीवली, सहकार निष्ठ पुरस्कार कोकण विभागातील महावीर नगर को-आॅप. हौसींग सोसायटी मानपाडा डोबिवली, पुणे विभागातून स्वप्नपुर्ती फेज-१ गृहरचना रावेत, हवेली पुणे व नागपूर विभागातील सहकारी कर्मचारी गृहनिर्माण भंडारा दिले जाणार आहेत.
औद्योगिक संस्था, हातमाग व यंत्रमाग संस्था, उपसा सिंचन संस्थेसाठीचे सहकार भूषण पुरस्कार महाबळेश्वर मध उत्पादक संस्था महाबळेश्वर, सातारा व महामुंबई छत्री उत्पादक संस्था कांजुमार्ग मुंबई यांना जाहीर करण्यात आले. फळे भाजीपाला, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्थांसाठीचे सहकार भूषण पुरस्कार दि. कुलाबा सेंट्रल को-आॅपरेटीव्ह लि. मुंबई, रयत सेवा कृषी उद्योग संघ कोल्हापूर तर सहकार निष्ठ पुरस्कार दि पांडव सह. विपणन आणी भातगिरणी गोंदिया, दूध उत्पादक कुक्कुटपालन संस्थांसाठीचे सहकार भूषण पुरस्कार गणेश सहकारी दूध व्यवसायीक संस्था राजुरी, ता. जुन्नर, सातपाटी मच्छिमार सोसायटी पालघर यांना दिले जाणार आहेत.
 

Web Title: Wardha Poultry Association's State Co-op for Maharishi Award, Sahakar Sangstan's award to Solapur anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.