वारी झाली गोड; पंढरपुरातील कार्तिकी यात्रेच्या उत्पन्नात सव्वा कोटींची वाढ
By Appasaheb.patil | Published: November 15, 2022 12:53 PM2022-11-15T12:53:11+5:302022-11-15T12:56:23+5:30
जय हरी विठ्ठल; ३ कोटी २० लाख ५९ हजार ५४२ रुपयांचे उत्पन्न
पंढरपूर : गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेमध्ये १ कोटी ९७ लाख ८३ हजार ५७ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तुलनेत यावर्षी १ कोटी २२ लाख ७६ हजार ४८५ रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एकूण ३ कोटी २० लाख ५९ हजार ५४२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी यादिवशी भरते. यावर्षी कार्तिकी यात्रेचा २६ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर असा कालावधी होता. यंदा कार्तिकी एकादशी ४ नोव्हेंबर रोजी झाली. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेमध्ये १ कोटी ९७ लाख ८३ हजार ५७ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १ कोटी २२ लाख ७६ हजार ४८५ रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.