कोरोनावर मात करून जनतेसाठी राबताहेत वॉरियर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:21+5:302021-06-02T04:18:21+5:30
कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ नये, म्हणून प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, यासाठी सर्वेक्षणापासून ते लसीकरणापर्यंतच्या कामाची संपूर्ण जबाबदारी गेल्या दीड ...
कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ नये, म्हणून प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, यासाठी सर्वेक्षणापासून ते लसीकरणापर्यंतच्या कामाची संपूर्ण जबाबदारी गेल्या दीड वर्षांपासून येथील आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षक, विस्ताराधिकारी व वैद्यकीय अधिकारी पार पाडत आहेत.
----
मला कोरोना झाल्यानंतर मानसिक टेन्शन असूनही मी दहा दिवस उपचार घेऊन त्यावर मात केली. नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा लगेच माझ्या कर्तव्यावर हजर झाले. मला काम करण्याचा आनंद वाटतो.
- मनीषा गिरी, आरोग्य सहाय्यक, मानेगाव.
----
कोरोना झाला, त्यावेळी मी लगेच उपचार सुरू केले व त्यावर प्रथम मात केली. यादरम्यान मला नेहमी माझ्या कुटुंबाची काळजी वाटत होती. परंतु लोकांची आरोग्य सेवा केल्याने मला काहीही झाले नाही. कोरोनावर मात करून लगेच कर्तव्यावर हजर झाले.
- उमा फुटाणे, आरोग्य कर्मचारी, रोपळे.
---
ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका पर्यवेक्षक म्हणून पंचायत समिती कार्यालयात आलो. भयंकर स्थिती असतानाही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर योग्यरित्या काम केल्याने तालुक्यातील बहुसंख्य रुग्ण बरे करण्यास मदत झाली. याचा मला आनंद आहे.
- अंकुश कुंभार, तालुका पर्यवेक्षक, पंचायत समिती, कुर्डूवाडी
----
कोरोनाची पहिली व दुसरी लाट आल्यानंतर माझ्या सर्व अधिकारी व कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून काम केले. त्यामुळे तालुक्यात कोरोनाला रोखता आले. यादरम्यान मी व घरातील सदस्य पॉझिटिव्ह आलो होतो, तरीही मी ड्युटीवर कार्यरत होतो. त्यावर मात करून पुन्हा मी जोमाने काम केल्याने रुग्ण संख्या कमी झाली.
- डॉ. शिवाजी थोरात, तालुका आरोग्य अधिकारी, माढा
---