उडगी येथील वनक्षेत्रातील पाणवठे पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:32+5:302021-02-05T06:48:32+5:30

वनक्षेत्रात पाण्याची सोय नसल्याने सध्या वन्य प्राण्यांची वणवण भटकंती सुरू आहे. फेब्रुवारी सुरू होताच उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे ...

The water bodies in the forest area at Udgi fell dry | उडगी येथील वनक्षेत्रातील पाणवठे पडले कोरडेठाक

उडगी येथील वनक्षेत्रातील पाणवठे पडले कोरडेठाक

Next

वनक्षेत्रात पाण्याची सोय नसल्याने सध्या वन्य प्राण्यांची वणवण भटकंती सुरू आहे. फेब्रुवारी सुरू होताच उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांचे हाल होऊ नयेत यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. मात्र सध्या या पाणवठ्यातील पाणी आटले आहे. त्यात टँकरद्वारे पाणी सोडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी होऊ लागली आहे.

कोट :::::::::::::

वाढत्या तापमानामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ येते. त्यामुळे वन विभागाने वन क्षेत्रातील अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठ्यांद्वारे त्यांची तहान भागवण्याची सोय करावी.

- बाळू माने,

पक्षी मित्र

कोट :::::::::::

उडगी ता. अक्कलकोट येथील वनविभागाच्या पाणवठ्यात येत्या चार-पाच दिवसांमध्ये टँकरद्वारे पाणी भरून वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल.

- प्रकाश डोंगरे,

वनपाल, अक्कलकोट

फोटो

०३उडगी

ओळी

उडगी ता. अक्कलकोट येथील वनक्षेत्र परिसरात पाण्याअभावी कोरडे पडलेले पाणवठे.

Web Title: The water bodies in the forest area at Udgi fell dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.