फिसरेमध्ये प्रथमच पोहोचले दहिगाव उपसा सिंचन योजनचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:32 AM2021-02-26T04:32:45+5:302021-02-26T04:32:45+5:30
यावर्षी फिसरे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून आल्यानंतर आ. शिंदे यांची भेट घेऊन आमच्या गावाला दहिगाव उपसाचे पाणी द्या, अशी ...
यावर्षी फिसरे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून आल्यानंतर आ. शिंदे यांची भेट घेऊन आमच्या गावाला दहिगाव उपसाचे पाणी द्या, अशी आग्रही मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत त्याची वचनपूर्ती झाली आहे. २४ फेब्रुवारीपासून फिसरे या गावाला पाणीपुरवठा सुरू झाला. तेथील ढवळे तलावात पाणी पोहोचले आहे. मुख्य कॅनाॅलपासून फिसरे गावातील ढवळे तलावापर्यंत लोकवर्गणीमधून गावकरी मंडळींनी चारी खोदायचे काम पूर्ण केले. हा तलाव १०० टक्के भरण्याचे नियोजन आहे.
या पाण्याचे पूजन सरपंच प्रदीप दौंडे, उपसरपंच लता नेटके, सदस्या वैशाली ठावरे, राधा अवताडे, हनुमंत रोकडे, प्रशांत नेटके, धनश्री काटे यांच्यासह भारत रोकडे, शरद नेटके, बाळू अवताडे, नारायण नेटके, महादेव आवताडे, संदीप नेटके, सुमित आवताडे, नारायण नेटके आदी ग्रामस्थांनी केले.
फोटो २५करमाळा-दहिगाव
फिसरे शिवातील ओढ्यात दहिगाव उपसा सिंजन योजनेचे पाणी प्रथमच आल्याने हात उंचावून जल्लोष करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.