शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी आता गावागावातील ‘वॉटर हिरो’ कष्ट घेणार

By Appasaheb.patil | Published: September 16, 2020 12:55 PM2020-09-16T12:55:59+5:302020-09-16T12:56:50+5:30

पानी फाउंडेशनची समृद्ध गाव स्पर्धा; चार तालुक्यातील १०५ गावे ठरली स्पर्धेसाठी पात्र

The 'Water Hero' in the villages will now work hard to increase the income of the farmers | शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी आता गावागावातील ‘वॉटर हिरो’ कष्ट घेणार

शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी आता गावागावातील ‘वॉटर हिरो’ कष्ट घेणार

googlenewsNext

सोलापूर : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या यशानंतर पानी फाउंडेशनने यावर्षी समृद्ध गाव स्पर्धा आयोजित केलेली आहे़ या स्पर्धेत चार तालुक्यातील १०५ गावांनी सहभाग नोंदविला आहे़ या गावांमध्ये होणारी निसर्गाची हानी थांबवून शेतकºयांना समृद्ध करण्यात येणार आहे़ सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा ही महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरण तसेच अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी योजली आहे. या स्पर्धेद्वारे गावागावातल्या पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला एक समृद्ध वळण देतानाच गावकºयांना त्यांच्या स्वप्नातले गाव उभे करण्यासाठी सक्षम करणे हे उद्दिष्ट असल्याची माहिती पानी फाउंडेशनचे प्रादेशिक समन्वयक विकास गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सन २०१६ पासून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या मनसंधारण ते जलसंधारण प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावं पाणीदार झाली़ आतापर्यंत पानी फाउंडेशनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन प्रशिक्षण करून गावागावात जलसंधारणाची कामे केली़ याचा प्रभाव म्हणून जिल्ह्यातील बहुतांश गावे टँकरमुक्त झाली़ गावागावात साचलेले पावसाचे पाणी कायम टिकून राहायचे असेल तर यापुढे जाऊन गावांनी एकत्रित विचार करणे गरजेचे आहे व तोच विचार घेऊन पानी फाउंडेशन या वर्षी समृद्ध गाव स्पर्धा २०२० आयोजित केली आहे. 

तालुकानिहाय सहभागी गावांची संख्या

  • - माढा - २६ गावे 
  • - उत्तर सोलापूर - २३ गावे
  • - करमाळा - २१ गावे
  • - बार्शी - ३४ गावे

------------
स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या तालुकानिहाय गावांची नावे 

  • - करमाळा तालुका - सरपडोह, शेलगाव, फिसरे, साडे, सालसे, देवीचामाळ, खडकी, निंभोरे, कोंढेज, गोरेवाडी, हुलगेवाडी, विहाळ, रोशेवाडी, जातेगाव, कामोणे, तरटगाव, वंजारवाडी, कुंभारगाव, घारगाव, पोथरे, वीट. 
  • - माढा तालुका - मोडनिंब, जाधववाडी (मो.), बैरागवाडी, वरवडे, परितेवाडी, होळे (खु.), उजनी (मा.), उपळवटे, भेंड, पडसाळी, अंजनगाव (उ.), जामगाव, वडाचीवाडी (अ उ), वडाचीवाडी(उ बु), उपळाई (खु), लोंढेवाडी, विठ्ठलवाडी, मानेगाव, धानोरे, बुद्रुकवाडी, चिंचोली, शिंदेवाडी, सोलंकरवाडी, रोपळे (क), अकुलगाव, भोगेवाडी़
  • - बार्शी तालुका - धामणगाव (दुमाला), मांडेगाव, कोरफळे, उंबरगे, काळेगाव, इर्ले, अरणगाव, सुर्डी, मानेगाव, पानगाव, हिंगणी (आर), लाडोळे, मुंगशी (वा), चिंचखोपण, हत्तीज, मालवंडी, कासारी, राळेरास, देवगाव, तावडी, चिंचोली (ढेंबरेवाडी), पिंपरी (पान), यावली(त), खांडवी.
  • उपळाई ठोंगे, कळंबवाडी (पा), चुंब, श्रीपत पिंपरी, अंबाबाईवाडी, खडकोणी, मुंगशी (आर), रातंजन, शेलगाव (मारकड), रस्तापूर. 
  • उत्तर सोलापूर तालुका - बेलाटी, भागाईवाडी, हिरज, राळेरास, अकोलेकाटी, एकरुख, कवठे, खेड, गुळवंची, तरटगाव, तेलगाव (सीना), दारफळ गावडी, नंदूर, नान्नज, बाणेगाव, रानमसले, वडाळा, वांगी, शिवणी, समशापूर, हगलूर, नरोटेवाडी, कळमण.

---------
या सहा स्तंभांवर चालणार काम...

  • मृदा आणि जलसंधारण
  • जलव्यवस्थापन आणि पाण्याचा ताळेबंद तयार करणे
  • जंगल आणि वृक्षांची लागवड व वाढ करणे
  • पौष्टिक गवताचे संरक्षित कुरण क्षेत्र तयार करणे
  • मातीचा पोत आणि आरोग्य सुधारणे आणि टिकविणे
  • प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधारभूत पाया तयार करणे

--------------
डिजिटल प्रशिक्षणावर भर....
या स्पर्धेसाठी गावागावातील लोकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे़ वेदांत अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल प्रशिक्षण देण्यावर यंदा भर देण्यात आला आहे़ आता सध्या गावामध्ये टेस्टिंगचे काम चालू आहे़ योग्य प्रशिक्षण देऊन गावं समृद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोकचळवळीच्या माध्यामातून करण्यात येत असल्याचे उत्तर तालुका प्रमुख नितीन आतकरे यांनी सांगितले.


यंदा पानी फाउंडेशनच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील १०५ गावे पात्र ठरली आहेत़ या गावात सहा स्तंभांनुसार कामे चालणार आहेत़ प्रामुख्याने निसर्गाची हानी थांबविणे अन् गावातील प्रत्येक शेतकºयाला समृद्ध करणे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे एकमेव ध्येय ठेवण्यात आले आहे़ 
- विकास गायकवाड,
प्रादेशिक समन्वयक, पानी फाउंडेशन, सोलापूर

Web Title: The 'Water Hero' in the villages will now work hard to increase the income of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.