उजनीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत घसरला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 03:14 PM2018-12-29T15:14:02+5:302018-12-29T15:15:05+5:30

भीमानगर :   उजनी धरणाची पाणीपातळी ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, मागील वर्षी आजच्या दिवशी उजनी धरणात १०५.८१ टक्के ...

The water level of Ujani dropped to 43 percent! | उजनीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत घसरला ! 

उजनीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत घसरला ! 

Next
ठळक मुद्देआॅगस्ट महिन्यात पाणीसाठा होता १०६ टक्केधरणात सध्या ८६.९९ टीएमसी पाणीसाठा २३.३३ टीएमसी पाणी उपयुक्त साठा

भीमानगर :  उजनी धरणाचीपाणीपातळी ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, मागील वर्षी आजच्या दिवशी उजनी धरणात १०५.८१ टक्के एवढा पाणीसाठा होता. आॅगस्ट महिन्यात १०६ टक्के असलेला पाणीसाठा डिसेंबर महिन्यात कमालीचा घटला आहे. 

यावर्षीच्या पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यात उजनी धरण १०६ टक्के भरूनही पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला असल्याचे जाणकार सांगतात. आज धरणात पाणीसाठा केवळ ४३ टक्के इतकाच आहे.याचे परिणाम ऐन उन्हाळ्यात दिसणार आहेत. सध्या सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असून ,रब्बी हंगामासाठीची जानेवारी महिन्यात बोगद्यातून सीना नदीत व कालव्याला पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यातच धरण रिकामे होणार आहे.

 सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून पाण्याचा उपसा सुरूच असून, त्यातच उन्हाळ्यात बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढणार आहे. याशिवाय सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव उपसा सिंचन योजना, बार्शी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन योजना या सर्व योजनांना ठरल्याप्रमाणे आवर्तने द्यावी लागणार आहेत.

यामुळे धरणातील साठा मायनसमध्ये येण्यास वेळ लागणार नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रामणे उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्याला साधारणपणे जानेवारीच्या २० तारखेला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. जानेवारीमध्ये सोडलेले पाणी साधारणत: ३० दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत पाण्याची फार अशी गंभीरता जाणवणार नाही, मात्र त्यानंतर पाणी.. पाणी.. करण्याची वेळ येणार आहे.

धरणात २३.३३ टक्के उपयुक्त साठा
- धरणात सध्या ८६.९९ टीएमसी पाणीसाठा असला तरी त्यापैकी २३.३३ टीएमसी पाणी उपयुक्त साठा आहे. त्यानंतर मात्र मृत साठ्यातील पाणी वापरावे लागणार आहे. हे पाणी पुढील वर्षी जुलै-आॅगस्ट महिन्यापर्यंत जपून वापरावे लागणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात धरणातील पाणीसाठा १०५ टक्के होता, तरीही जुलैपर्यंत धरण मायनसमध्ये आले होते. यावर्षीची स्थिती तर फारच गंभीर आहे. 

Web Title: The water level of Ujani dropped to 43 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.