उजनीची पाणी पातळी वाढू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:27 AM2021-09-09T04:27:59+5:302021-09-09T04:27:59+5:30

पुणे जिल्ह्यातील पाऊस गडप झाल्याने उजनी धरणातील पाण्याची पातळी ६२ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत खालावली होती. सध्या दौंड परिसरात संततधार ...

The water level of Ujani started rising | उजनीची पाणी पातळी वाढू लागली

उजनीची पाणी पातळी वाढू लागली

Next

पुणे जिल्ह्यातील पाऊस गडप झाल्याने उजनी धरणातील पाण्याची पातळी ६२ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत खालावली होती. सध्या दौंड परिसरात संततधार सुरू असल्याने दौंडमधून उजनीमध्ये ४९५० क्युसेकनी विसर्ग सुरू आहे. दोन दिवसामध्ये उजनीत दोन टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. बुधवारी ६२.७० टक्क्यांपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर दमदार पावसाची आवश्यकता आहे. आता महिनाभरात पावसाळा संपणार आहे. तरीही यंदा धरणे भरलेली नाही. अशीच परिस्थिती राहिल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची चिंता वाढणार आहे. बुधवारी सायंकाळी उजनीची एकूण पाणीपातळी ४९५ मीटर होती, तर एकूण पाणीसाठा ९७.२० टीएमसी होता. उपयुक्त पाणीसाठ्याचा ३३.६० टीएमसी झाला आहे, तर टक्केवारी ६२.६० टक्के झाली आहे.

उजनीतून सीना माढा उपसा ७४, दहिगाव उपसा १२६, कालवा ७०० क्युसेकनी विसर्ग सुरू आहे.

Web Title: The water level of Ujani started rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.