सीना-कोळगाव धरणातील पाणी परांडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:27+5:302021-05-13T04:22:27+5:30
करमाळा : परांडा तालुक्याने सीना-कोळगावचे पाणी मंजुरीनुसार घ्यावे. करमाळा तालुक्याच्या वाटपाचे पाणी घेऊ नये अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा ...
करमाळा : परांडा तालुक्याने सीना-कोळगावचे पाणी मंजुरीनुसार घ्यावे. करमाळा तालुक्याच्या वाटपाचे पाणी घेऊ नये अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष संजय घोलप यांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील सीना-कोळगाव धरण हे करमाळा व परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे, याच धरणाच्या पाणी सोडण्यासाठी परांडा कालवा सल्लागार समितीची बैठक १७ मार्च २०२१ रोजी उस्मामानाबादच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत सीना- कोळगाव उन्हाळी हंगामासाठी सन २०२०-२१ साठी ८.५० द.ल.घ.मी. पाणी सोडण्याची मंजुरी देण्यात आली. त्यानुसार २६ मार्च २०२१ रोजी भौद्रा बंधाऱ्यात ३.५० द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले; परंतु ११ मे २०२१ रोजी सकाळी ६ वाजता उर्वरित पाणी सोडण्यात आले. मंजुरी दिलेल्यापेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले. त्यामुळे करमाळा तालुक्यातील करंजे, बोरगाव, दिलमेशवर, वाघाची वाडी, भालेवाडी, अर्जुननगर मिरगव्हाण, हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव, गौडरे, पांडे, फिसरे, सालसे आदी गावातील शेतकरी चिंतित आहेत.
यावर मनसेच्या वतीने तहसीलदार, आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन मनमानीने पाणी उचलल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष अशोक गोफणे, राजाभाऊ बागल, शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, विजय रोकडे, रामभाऊ जगताप, सतीश फंड, आनंद मोरे, तेजस राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----