उजनीतून भीमानदीत सोडलेले पाणी आज पंढरपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:22 AM2021-03-26T04:22:14+5:302021-03-26T04:22:14+5:30
भीमानदीला ६ हजार ४०० क्यूसेक्सनी, कालवा ४०० क्यूसेक, वीजनिर्मिती १६०० क्यूसेक, बोगदा ४०० क्यूसेक, सीना-माढा उपसा २५९ क्यूसेक, दहिगाव ...
भीमानदीला ६ हजार ४०० क्यूसेक्सनी, कालवा ४०० क्यूसेक, वीजनिर्मिती १६०० क्यूसेक, बोगदा ४०० क्यूसेक, सीना-माढा उपसा २५९ क्यूसेक, दहिगाव १०५ क्यूसेक असे एकूण नऊ हजार क्यूसेकनी विविध सिंचन योजनांना उन्हाळी आवर्तन पाणी देण्यात आले आहे. कालव्याच्या विसर्गात येत्या दोन दिवसात वाढ करण्यात येईल.
दरम्यान २० मार्च भीमानदी व कालवा व बोगद्यातून सोडण्यात आलेल्या दिवशी उजनी धरण प्लस ६१ टक्के होते तर शुक्रवारी धरणाची टक्केवारी होती प्लस ५६ टक्के म्हणजे सहा दिवसात सहा टक्के धरणातील पाणी साठा कमी झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पाण्याच्या आवर्तनाने बळीराजा सुखावला आहे. चालू हंगामात शेतकऱ्यांसाठी पाण्याची,चाऱ्याची व पिकांची गरज या आवर्तनाने भागणार आहे.
-----