उजनीतून उजवा व डावा कालव्याला ५०० क्युसेक प्रवाहाने सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:29+5:302021-08-17T04:27:29+5:30

जिल्ह्यात सध्या पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे लाखो एकर क्षेत्रातील खरीप पिके व फळबागा पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उजनी धरणात ...

Water released from Ujani to right and left canals at a rate of 500 cusecs | उजनीतून उजवा व डावा कालव्याला ५०० क्युसेक प्रवाहाने सोडले पाणी

उजनीतून उजवा व डावा कालव्याला ५०० क्युसेक प्रवाहाने सोडले पाणी

Next

जिल्ह्यात सध्या पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे लाखो एकर क्षेत्रातील खरीप पिके व फळबागा पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उजनी धरणात सध्या ६२ टक्केपेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. त्यामुळे उजवा व डावा कालव्यातून शेतीला पाणी तातडीने देण्यात यावे अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार उजनी धरणातून उजवा व डावा कालव्यातून पाणी सोडण्याबाबत सकारात्मकता दर्शवित रविवारपासून पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली.

----

उजनी धरण

पाण्याची पातळी ४९४.९८५ मीटर

एकूण साठा २७४८.३५ द.ल.घ.न.मी.

उपयुक्त पाणी साठा ९४४.५४ द.ल.घ.न.मी.

धरणात ६२.२६ टक्के पाणीसाठा आहे.

बंडगार्डन विसर्ग : ३२०० दौंड विसर्ग : २४७० ---

Web Title: Water released from Ujani to right and left canals at a rate of 500 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.