उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:39 PM2018-09-14T13:39:27+5:302018-09-14T13:40:53+5:30
सोलापूर : उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी १३ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आल्याची माहिती उजनी विभागाने दिली़ १ आॅगस्ट कालव्याला सुरु केलेले पाणी आजअखेर बंद करण्यात आले आहे.
१ आॅगस्ट रोजी कालव्याला ५०० क्युसेक्सने पाणी सुरु केले होते. २ आॅगस्ट रोजी त्यात वाढ करून ९०० क्युसेक करण्यात आले होते़ त्यानंतर त्यातही वाढ करून ५ सप्टेंबरपर्यंत ३२५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होते़ मात्र वरील धरणातून येणारे पाणी कमी कमी करत गुरुवारी सायंकाळी ६.०० पुर्णपणे बंद करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला असून उजनी धरण हे पुणे जिल्ह्यात सतत पडणाºया पावसाने पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मायनस २० वरून धरण प्लस १०६ टक्के झाले होते. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून एकमेव उजनीवर जिल्ह्याची मदार आहे. शेतकºयांना आता फक्त उजनी धरणामुळेच काय तो आधार मिळणार आहे. प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करून वर्षभर सर्व उपसासिचंन योजना व नदी कालवा यांना योग्य वेळी पाणी सोडून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे शेतकरी संघटनेने परिपत्रकान्वये म्हटले आहे़