सोलापूर जिल्ह्यातील २१७ गावे अन् १४२५ वाड्यांवर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 01:01 PM2019-05-06T13:01:32+5:302019-05-06T13:03:14+5:30

झळा टंचाईच्या : पावणेपाच लाख लोकांची तहान भागतेय २४१ टँकरच्या पाण्यावर

Water shortage on 217 villages and 1425 wards of Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील २१७ गावे अन् १४२५ वाड्यांवर पाणीटंचाई

सोलापूर जिल्ह्यातील २१७ गावे अन् १४२५ वाड्यांवर पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देटँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चपारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६२ हजार ९0९ लोकांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर भागत आहे. २४१ गावे तर १ हजार ४२५ वाड्यांना टँकरच्या पाण्याचा मोठा आधार झाला आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्यात १२ टँकर सुरू असून, ११ गावांतील ३५ हजार ९७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.बार्शी तालुक्यात १0 टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व एका वाडीवरील १६ हजार ८0८ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय ४२ खासगी विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करून टंचाई गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्यात २२ टँकर सुरू करण्यात आले असून, १३ गावांतील ५८ हजार ५0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १९ विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्यात ११ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावांतील १६ हजार ८0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. २0 विंधन विहीर व विहिरीचेही पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. 

माढा तालुक्यात १७ टँकर सुरू करण्यात आले असून, १४ गावे व २९ वाड्यांवरील ४१ हजार २७६ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय १४ विंधन विहिरी व विहीरही पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यात ४३ टँकर सुरू असून, ४३ गावे व ३३९ वाड्यांवरील ८८ हजार ८५७ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १0 विंधन विहीर व विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

मोहोळ तालुक्यात १२ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व ७४ वाड्यांवरील २५ हजार ५९0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय २ विहीर व विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यात ५५ टँकर सुरू करण्यात आले असून, ४७ गावे व ५२३ वाड्यांवरील ८३ हजार ६00 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

सांगोला तालुक्यात ४८ टँकर सुरू करण्यात आले असून, ४३ गावे व ३२३ वाड्यांतील ६५ हजार २३२ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. माळशिरस तालुक्यात ११ टँकर सुरू असून, १३ गावे व १३६ वाड्यांवरील ३0 हजार २६४ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

टँकर फेºयांच्या तपासणीसाठी पथके 
- दुष्काळी परिस्थितीमुळे रोज टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. टँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याने यात पारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टँकर गेला कोठे, थांबला कुठे याची माहिती अधिकाºयांना कार्यालयात बसून मिळत आहे. याशिवाय टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

Web Title: Water shortage on 217 villages and 1425 wards of Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.