सीना-माढा उपसा योजनेतील पाणी पोहोचले गालिशबाबा तलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:27 AM2021-08-25T04:27:45+5:302021-08-25T04:27:45+5:30
आमदार शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या माध्यमातून या योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत ...
आमदार शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या माध्यमातून या योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे, तसेच भविष्यात या भागातील शक्य असलेले सर्व पाझर तलाव, गावतळी व बंधारे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी सोसायटीची स्थापना करून वेळेवर वीज बील व पाणी पट्टी भरल्यास ही योजना कायमस्वरूपी फलदायी ठरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य झुंजार भांगे, जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, सरपंच संदीप पाटील, पंचायत समिती सदस्य दगडू शिंदे, सुभाष जाधव, राजू गोटे, शहाजी चवरे, दत्तात्रय अंबुरे, ॲड. शैलेश मेहता, ॲड,सुरेश पाटील, अनिलकुमार अनभुले, अभियंता विलास देशमुख, प्रशांत चव्हाण, धनाजी बेडगे, अभिषेक देशमुख, संतोष जाधव, रामचंद्र भांगे, आण्णासाहेब पाटील, प्रदिप चौगुले, श्रीकांत कोरे, बाळासाहेब कदम, अशोक पाटील, हनुमंत मोहिते, विलास बोराडे, अनिल कदम आदी उपस्थित होते.
.........
शेतकऱ्यांसाठी वरदायनी
सीना-माढा उपसा सिंचनाच्या माध्यमातून उजनी धरणातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी वरदायनी ठरणार आहे. आ. बबनराव शिंदे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून कार्यान्वित केल्याने माढा व उपळाई परिसरातील अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी व्यक्त केले.
.......
फोटो २४माढा
240821\1559-img-20210824-wa0016.jpg
फोटो ओळी - माढा ते उपळाई बुद्रुक रोडजवळील गालिशबाबा येथील तलावातील पाणी पूजन करताना झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे,शंभूराजे मोरे,झुंजार भांगे,संदीप पाटील व इतर मान्यवर.