ऐन उन्हाच्या कडाक्यात सोलापुरात पाच दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 03:05 PM2019-03-26T15:05:02+5:302019-03-26T15:06:14+5:30

टंचाई : वेळेवर पाणी न सोडल्याचा परिणाम

Water in Solapur for 5 days | ऐन उन्हाच्या कडाक्यात सोलापुरात पाच दिवसाआड पाणी

ऐन उन्हाच्या कडाक्यात सोलापुरात पाच दिवसाआड पाणी

Next
ठळक मुद्देऔज बंधारा कोरडा पडल्यानंतर आता टाकळी जॅकवेलमधील पाण्याची पातळी २ फूट ९ इंच इतकी आहेउजनी धरणातून वेळेवर पाणी सोडण्याचे प्रयत्न न झाल्याने शहरावरील नागरिकांवर जलसंकट ओढवले आहे. 

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडल्यानंतर आता टाकळी जॅकवेलमधील पाण्याची पातळी २ फूट ९ इंच इतकी आहे. या कारणास्तव मंगळवारपासून शहरात पाच दिवसाआड पाणी येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे.  उजनी धरणातून वेळेवर पाणी सोडण्याचे प्रयत्न न झाल्याने शहरावरील नागरिकांवर जलसंकट ओढवले आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी औज बंधारा कोरडा पडला होता. उजनी धरणातून भीमा नदीत १५ मार्चपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली होती. परंतु, उजनी धरणातून कालव्यांसाठी पाणी सोडण्यात आले होते. हे आवर्तन पूर्ण होईपर्यंत भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. 

हे पाणी औज बंधाºयात पोहोचण्यास सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. टाकळी येथील पाण्याचा उपसा कमी होणार असल्याची बाब विचारात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.  औज बंधाºयात पाणी येईपर्यंत शहरात पाच दिवसाआड पाणी येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Water in Solapur for 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.