जिल्ह्यातील ४० टँकरने पाणी पुरवठा, सर्वाधिक टंचाई माळशिरस मध्ये सुरु
By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 6, 2024 05:18 PM2024-04-06T17:18:26+5:302024-04-06T17:19:10+5:30
एप्रिल महिना सुरू होताच जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत आहे.
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : एप्रिल महिना सुरू होताच जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत आहे. मार्च अखेर जिल्ह्यात केवळ एक अंकी टँकर सुरू होता. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या चाळीसवर पोहोचली आहे. सर्वाधिक टंचाई माळशिरस तालुक्यात असून या ठिकाणी १४ गावांमध्ये चौदा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
माळशिरस तालुक्यानंतर सर्वाधिक पाणी टंचाई करमाळ्यात आहे. करमाळ्यात दहा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सांगोल्यात ७ गावात तसेच माढ्यात तीन गावात चार टँकर सुरू आहेत. मंगळवेढ्यात एका गावात तर दक्षिण सोलापूर मध्ये दोन गावात पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. माळशिरस मध्ये भांब, पिंपरी, गारवाड, मगरवाडी, फडतरी, फडतरी शिवारवस्ती, फडतरी निटवेवाडी, कोथळे, बचेरी, माणकी, लोंढेमोहितेवाडी, सुळेवाडी, जळभावी, लोणंद आदी गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच माढ्यात तुळशी,बावी, कुर्डू या तीन गावात चार टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
करमाळ्यात घाटी, साडे, आळसुंदे, फिसरे, सालसे, निबोरे, रायगाव, देलवडी, वरकुटे आदी गावात तसेच सांगोल्यात सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, कटफळ, अचकदानी, चिकमहुद, चिकमहूद १ या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.