पाईपलाईन गळती दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:12+5:302021-09-08T04:28:12+5:30
शहरातील भुयारी गटार योजना, रस्त्यांच्या कामाची प्रगती, पाणी पुरवठा, आगामी गणेशोत्सव व शहरातील वाढत्या चोऱ्या याबाबत आमदार राजेंद्र राऊत ...
शहरातील भुयारी गटार योजना, रस्त्यांच्या कामाची प्रगती, पाणी पुरवठा, आगामी गणेशोत्सव व शहरातील वाढत्या चोऱ्या याबाबत आमदार राजेंद्र राऊत यांनी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आढावा बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. असिफभाई तांबोळी, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस उपनिरीक्षक शामराव गव्हाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता गफार शेख, शाखा अभियंता जी. एस. करळे, विजयन खिल्लारी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक विलास रेणके, पक्षनेते विजय राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक भारत पवार, बापूसाहेब वाणी, बाळासाहेब लांडे, जलदाय अभियंता अजय होनखांबे, नगर अभियंता भारत विधाते, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
-----
भुयारी गटारीची ८० टक्के कामे पूर्ण
शहरातील ज्या-ज्या भागात हे काम पूर्ण झाले आहे, त्या भागात रस्त्यांची सुरू असलेल्या कामाचीही माहिती घेतली. जवळपास ७० ते ८० टक्के प्रमाणात भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले आहे. काही भागातील रस्त्यांची कामे ही पावसाच्या व्यत्ययामुळे थांबली आहेत. परतीच्या पावसानंतर त्या रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आ. राऊत म्हणाले.
---
सुरक्षा दल स्थापण्यावर चर्चा
गेल्या काही दिवसांत बार्शी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी नगरसेवक व पोलीस प्रशासन सर्वांनी मिळून जागरूक राहून गल्लोगल्ली एकमेकांच्या सहकार्याने सुरक्षा दल स्थापन करण्याच्या योजनेबाबत पोलीस निरीक्षक आणि आमदारांनी बैठकीत चर्चा केली. शहरातील शिवाजीनगर व सुभाषनगर भागातील पोलीस चौकी दुरुस्त करून द्यावी अशी पोलिसांच्या वतीने मागणी करण्यात आली. पालिकेने त्याबाबतही सकारात्मकता दाखवली.
-----------