सोलापूरात विस्कळीत पाणीपुरवठा, चार दिवसाआड येतेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:46 PM2018-05-22T12:46:02+5:302018-05-22T12:46:02+5:30

Water supply disrupted in Solapur, four days water coming from | सोलापूरात विस्कळीत पाणीपुरवठा, चार दिवसाआड येतेय पाणी

सोलापूरात विस्कळीत पाणीपुरवठा, चार दिवसाआड येतेय पाणी

Next
ठळक मुद्देउजनीहून दररोज ७0 दशलक्ष लिटर पाणी शहरात येतेशहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहेशहरात तिन्ही उद्भवातून येणाºया पाण्याची परिस्थिती वाईट

सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेऊन पुढील आठवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आदेश दिल्यावर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे रजेवर गेले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यात सातत्य असून, नवीन नियोजन पावसाळ्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. नगरसेवकांनी त्रागा व्यक्त करण्यास सुरुवात केल्यावर पालकमंत्री देशमुख यांनी पुढाकार घेऊन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश दिले. पण त्यानंतरही शहरात तिन्ही उद्भवातून येणाºया पाण्याची परिस्थिती वाईट असल्याचे चित्र समोर येत आहे.

उजनीहून दररोज ७0 दशलक्ष लिटर पाणी शहरात येते. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्धीकरणानंतर हे पाणी वितरणासाठी शहराकडे पाठविले जाते. चिंचोळी एमआयडीसीला यातील साडेपाच दशलक्ष लिटर पाणी जाते. त्यानंतर केगाव, बाळे येथील टाक्यांना पाणी दिले जाते. तेथून अवंतीनगर, नेहरुनगरपर्यंतच्या टाक्या भरून पाणी वितरण केले जाते. हिप्परग्यातून पाणी कमी येत असल्याने भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्राकडे यातील १५ दसलक्ष लिटरची एक जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पण या जलवाहिनीतून पाणी गिरणीला पाणी येतच नसल्याचे दिसून येत आहे. वाटेत थेट कनेक्शन देऊन हे पाणी पळविण्यात आल्यामुळे हद्दवाढ भागाला याचा मोठा फटका बसत आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील व वितरणाच्या इतर टाक्या भरल्यावर टाकळी व उजनी पंपहाऊसमधील चौथा पंप दर सहा तासांनी बंद करावा लागतो. अशी स्थिती असताना पाईपलाईनमध्ये बरेच पाणी जाते असे दाखवून अशा थेट कनेक्शनला संरक्षण देण्यात येत आहे. चिंचपूर बंधाºयातील पातळी खालावल्यावर औज बंधाºयातील सर्व पाणी खाली घेण्यात आले आहे. यामुळे औज बंधाºयातून शेतीसाठी होणारा उपसा थांबला आहे. आता टाकळी इंटेकजवळ ५ जूनपर्यंत पुरेल इतपत पाणीसाठा आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाºयांना कळविले आहे. पुढील आठवडाभरात पाऊस न झाल्यास औज बंधाºयातून उजनीतून पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत तीन दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास हा कालावधी आणखी खाली येणार आहे. एकूणच पुढील आठवड्यात तीन दिवसाआडच्या गणितावर गंडांतर येण्याची चिन्हे दिसत आहेत. 
 टँकर घोटाळ्याबाबत पळापळ
- विभागीय कार्यालय क्र. २ मधील टँकर घोटाळ्याबाबत नगरसेवक नागेश वल्याळ  यांनी संबंधित अधिकाºयांच्या लागेबांधे उघड केले आहेत. याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना लेखी पुरावे दिले आहेत. त्यानंतर अधिकाºयांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. भवानीपेठ येथील रजिस्टर गायब झाल्याचे नगरसेवक वल्याळ यांनी सांगितले. 

Web Title: Water supply disrupted in Solapur, four days water coming from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.