सोलापूर शहरावर जलसंकट, औज बंधाºयातील पाण्याने तळ गाठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 06:28 PM2017-07-25T18:28:02+5:302017-07-25T18:29:06+5:30
सोलापूर दि २५ : टाकळी योजनेतून सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेला औज बंधारा कोरडा झाला आहे. टाकळी इंटेकजवळ साडेपाच फूट पाणी असून, उजनीतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २८ जुलै रोजी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५ : टाकळी योजनेतून सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेला औज बंधारा कोरडा झाला आहे. टाकळी इंटेकजवळ साडेपाच फूट पाणी असून, उजनीतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २८ जुलै रोजी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे.
महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी औज बंधाºयातून उजनीतून भीमेत पाणी सोडण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. महापौर, पालकमंत्री यांच्यामार्फत केलेली मागणी जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी औज व चिंचपूर बंधाºयातील पाणी स्थितीची पाहणी केली आहे. उजनीतून भीमेत पाणी सोडल्यास सहा दिवसात औज बंधाºयात येईल, असे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले आहे. पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने उजनी धरणात पाणी आले आहे. पण सोलापूर जिल्ह्यात व औज बंधारा परिसरात पाऊस नाही. वारे व उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे औज बंधारा रिकामा करून चिंचपूर बंधाºयात पाणी घेण्यात आले आहे. टाकळी इंटेकजवळ ५ फूट ४ इंच पाणी आहे. ३0 जुलैपर्यंत हे पाणी पुरेल. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात पाऊस न झाल्यास स्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे २८ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे.
पावसाने ताण दिल्यास पाणीपाळी एक दिवसाने पुढे नेण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. गतवर्षीही जुलै महिन्यात पाण्याची हीच स्थिती राहिली. नेमके पाणी सोडल्यानंतर पाऊस सुरू झाला. औज बंधाºयातून पाण्याच्या चार पाळ्या घेतल्या जातात. गेल्यावर्षी तीनच पाळ्यात पाणी घेण्यात आले. आता पावसाळा असला तरी पाऊसच न झाल्याने पाणीपाळी घेण्याची वेळ आली आहे. उजनीतून पाणी सोडले तर पाणी सोडल्यापासूनचे बिल महापालिकेस भरावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे ढगाकडे लागले आहेत. दररोज ढग भरून येतात, पावसाची स्थिती निर्माण होते पण दिवस कोरडा जातो. या स्थितीत नेमका काय निर्णय घ्यावा, या विवंचनेत पदाधिकारी व अधिकारी अडकले आहेत.