पावसाळ्यात सोलापूरला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:55 PM2018-06-05T12:55:27+5:302018-06-05T12:55:27+5:30

चिंचपूर बंधाराही कोरडा पडल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने  घेतला.

Water supply to Solapur in rainy season for five days | पावसाळ्यात सोलापूरला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

पावसाळ्यात सोलापूरला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात गेले दोन दिवस ढगाळी हवामानपाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षपणामुळे शहरावर दुसºयांदा जलसंकटऔज बंधाºयातील पाणी यापूर्वीच संपले

सोलापूर : गेल्या दोन दिवसांत सोलापुरात पावसाळी वातावरण असले तरी आता चिंचपूर बंधाराही कोरडा पडल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने  घेतला आहे. 

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया भीमा नदीतील औज बंधाºयातील पाणी यापूर्वीच संपले आहे. आता टाकळी पंपगृहासाठी कार्यरत असलेल्या चिंचपूर बंधाºयातील जॅकवेलजवळ सोमवारी ८ इंच पाणी होते. उजनी धरणातून सोलापूरसाठी १९ मे रोजी पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी हे पाणी पुळूज बंधाºयापर्यंत पोहोचले आहे.

सहा बंधारे व ९0 किलोमीटरचा प्रवास आणखी असल्याने औज बंधाºयापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. टाकळी पंपगृहातील केवळ दोन पंप चालवून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आल्याने आठवडाभर निर्माण होणारी टंचाई दूर करण्यासाठी ५ जूनपासून पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. चिंचपूर बंधाºयात पाणी आल्यानंतर शहराला पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

शहरात गेले दोन दिवस ढगाळी हवामान आहे. त्यामुळे पाण्याची मागणी घटली आहे. अशात उन्हाचा कडाका वाढल्यास नागरिकांची अडचण होणार आहे. पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षपणामुळे शहरावर दुसºयांदा जलसंकट कोसळले आहे, असा आरोप नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांनी केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, जाणूनबुजून नागरिकांना वेठीस धरणाºया संंबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Water supply to Solapur in rainy season for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.