वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:45+5:302021-02-11T04:23:45+5:30
तालुक्यात एकूण ८४५ हेक्टर वनक्षेत्र आहे. यापैकी उडगी, काझीकणबस, किरनळ्ळी, वागदरी, कर्जाळ, बोरेगाव या ठिकाणी वनक्षेत्र आहेत. तालुक्यात ...
तालुक्यात एकूण ८४५ हेक्टर वनक्षेत्र आहे. यापैकी उडगी, काझीकणबस, किरनळ्ळी, वागदरी, कर्जाळ, बोरेगाव या ठिकाणी वनक्षेत्र आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्याने या वनक्षेत्रात भरपुर प्रमाणात विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांचा अधिवास आहे.
कोट ::::::::
वनविभागाने लोकमतच्या बातमीची दखल घेऊन उडगी वनक्षेत्रातील पाणवठ्यात वन्यजीवांना पाण्याची सोय केली. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणाऱ्या भटकंती थांबेल. यासाठी लोकमतच्या लोकोपयोगी पत्रकारिता कारणीभूत ठरली.
- गिरमल जमादार, वन्यजीवप्रेमी
कोट :::::::::::
अक्कलकोट तालुक्यातील वनक्षेत्रातल्या पाणवठ्यावर पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी उडगी येथील पाणवठ्यत पाणी टाकले आहे. येत्या चार-पाच दिवसामध्ये उर्वरित पाणवठ्यावर टँकरने भरून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल.
- प्रकाश डोंगरे,
वनपाल, अक्कलकोट
फोटो
१०उडगी०१
ओळ
उडगी वनक्षेत्रातील पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडताना कर्मचारी.