वाळूजमधील अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:54+5:302021-04-06T04:20:54+5:30
वाळूज : वाळूज (ता. मोहोळ) येथील अभयारण्यात वन विभागाने ठिकठिकाणी वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून पाण्याची सोय केली आहे. ...
वाळूज : वाळूज (ता. मोहोळ) येथील अभयारण्यात वन विभागाने ठिकठिकाणी वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून पाण्याची सोय केली आहे.
वाळूज येथे ८० एकर क्षेत्रावर अभयारण्य आहे. त्यात हरीण, काळवीट, ससे, लांडगे, रानडुक्कर, कोल्हा तर पक्ष्यांमध्ये मोर, लांडोर, कावळे, कबुतर, चिमणी असे विविध पशू-पक्षी आहेत. अभयारण्यात पाणी नसल्यामुळे हे वन्यप्राणी लगतच्या वस्तीवर आणि विहिरीवर येऊ लागले होते. रानोमाळ सैरावैरा धावत पळू लागले होते. याची तातडीने मोहोळ वन विभागाने दखल घेऊन टँकरव्दारे अभयारण्यात पाण्याची सोय केली आहे. यासाठी वनक्षेत्रपाल पवार, वनरक्षक सचिन कांबळे, वनमजूर विष्णू मोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो
०५ वाळूज
ओळी
वाळूज येथील अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी वन विभागातर्फे पाणवठे तयार करून त्यात पाणी सोडण्यात आले आहे.