तामदर्डी-रहाटेवाडी पुलावर पाणी, गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:03+5:302021-09-27T04:24:03+5:30
पावसामुळे शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला. नगरपालिकेच्या अनेक व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी आल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा ...
पावसामुळे शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला. नगरपालिकेच्या अनेक व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी आल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा ४५, मरवडे १३, आंधळगाव ५३, मारापूर ४०, भोसे ९, बोराळे ५९, हुलजंती ७, सरासरी ३२.२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर नव्याने झालेल्या पाठखळ महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाही. अचूक पावसाची नोंद होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी गावोगावी पर्जन्यमापक यंत्र बसवावेत, अशी मागणी केली आहे.
.....................
फोटो ओळी: शनिवारी झालेल्या पावसाने तामदर्डी-रहाटेवाडी या मार्गावर पाणी आल्याने या गावांचा संपर्क पूर्णपणे बंद झाला आहे.
260921\img-20210926-wa0028-01.jpeg
फोटो ओळी- शनिवारी झालेल्या पावसाने तामदर्डी- रहाटेवडी या मार्गावर पाणी आल्याने या गावांचा संपर्क पूर्णपणे बंद झाला आहे