उजनीतून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:37 AM2020-12-12T04:37:50+5:302020-12-12T04:37:50+5:30

उजनी धरणात सध्या ११० टक्‍के पाणीसाठा असून, त्यात ५८.९४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी ...

Water was released from the canal through the canal for the rabbi season | उजनीतून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले

उजनीतून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले

Next

उजनी धरणात सध्या ११० टक्‍के पाणीसाठा असून, त्यात ५८.९४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. रब्बी पिकांसाठी आता पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. पुढील पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात रब्बी पिकांखाली ३ लाख ५१ हजार ८२० हेक्‍टर एवढे क्षेत्र आहे, तर ३८ हजार ८०० हेक्‍टर गहू या पिकाखालील क्षेत्र आहे. मक्याचे क्षेत्र ३५ हजार २५० हेक्‍टर असून, तृणधान्याचे जिल्ह्यात ४ लाख २५ हजार ४२५ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४८ हजार हेक्‍टरवर तृणधान्यांची लावगड झाली आहे. हरभरा पिकाचे एकूण क्षेत्र ५५ हजार ८० हेक्‍टर झाले आहे. जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. पावसाळा संपून आता दोन महिन्यांचा कालावधी होत असून रब्बी पिकांना येणाऱ्या काळात पाण्याची गरज भासणार आहे. कोरोनामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप होऊ शकलेली नाही.

Web Title: Water was released from the canal through the canal for the rabbi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.