उजनी धरणातून पाणी सुटणार ; जलसंपदामंत्र्यांनी दिला ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:48+5:302021-08-01T04:21:48+5:30
आमदार शिंदे यांच्या वस्तुनिष्ठ मागणीचा विचार करून जलसंपदामंत्र्यांनी संमती देऊन पाटबंधारे विभागाला उजनीतून पाणी सोडण्याचा आदेश दिलेला आहे, त्यामुळे ...
आमदार शिंदे यांच्या वस्तुनिष्ठ मागणीचा विचार करून जलसंपदामंत्र्यांनी संमती देऊन पाटबंधारे विभागाला उजनीतून पाणी सोडण्याचा आदेश दिलेला आहे, त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत कालवा, बोगदा, सिना-माढा व दहिगाव सिंचन योजनाद्वारे शेतीसाठी निश्चित पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली आहे.
----
जलसंपदा विभाग आणि धरण लवादाच्या नियमानुसार धरण प्रकल्पात ३० टक्के पेक्षा जास्त पाणी झाल्यास व लाभक्षेत्रात कांही प्रमाणात अवर्षणग्रस्त परिस्थिती असल्यास पाटबंधारे खात्याने शेतीसाठी पाणी सोडणे आवश्यक असते. त्याच नियमानुसार उजनी धरण आता ५० टक्के झाले असून, खरीप हंगामातील आवर्तनाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
---
पाणी मागणीचे अर्जकरावे
मुख्य कालवा वीस किलोमीटर, डावा कालवा १२६ किलोमीटर व उजवा कालवा १२२ किलोमीटर तसेच भीमा सीना बोगद्यातून सीना नदीत व सीना माढा आणि दहीगाव या दोन्ही सिंचन योजनातून आता पाणी सुटणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणीचे अर्ज तातडीने पाटबंधारे खात्याकडे भरून, असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.
---
फोटो : बबनदादा शिंदे