Intarview; लोकसभा निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम : राजेंद्र भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:27 PM2019-03-18T18:27:31+5:302019-03-18T18:30:40+5:30
संतोष आचलारे सोलापूर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यातील अंतिम यादीनुसार सोलापूर व माढा या दोन्ही ...
संतोष आचलारे
सोलापूर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यातील अंतिम यादीनुसार सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघात तब्बल ३३ लाख ४४ हजार ५८५ मतदार आहेत. मतदान कशा पध्दतीने होणार, यात नवीन काय प्रणाली सुरू झाली याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची ही बोलकी उत्तरे !
प्रश्न : लोकसभा निवडणुकीची तयारी कितपत झाली आहे?
उत्तर : लोकसभा निवडणूकीसाठी मतदान घेण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघासाठी ३ हजार ५४0 मतदान केंद्र असतील. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे तीस हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान घेण्यासाठी आम्ही पुर्ण सक्षम आहोत.
प्रश्न : सोशल मीडियावरील प्रचारावर नियंत्रण कसे असणार?
उत्तर : सोशल मिडीयावर करण्यात येणाºया प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मीडिया नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. आचारसंहितेचा भंग करणारे मजकूर आढळल्यास त्याविरुद्ध संबंधितावर कारवाई करण्यात येईल. परवानगी विना प्रचार करणाºया मजकुराचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येईल. फ्लेक्स, पत्रके आदी माध्यमातून करण्यात येणाºया प्रचार साहित्यांची तपासणी करण्यासाठीही विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
प्रश्न : मतदानासाठी किती कर्मचारी नेमण्यात आले आहेत ?
उत्तर : लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया घेण्यासाठी सुमारे तीस हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाºयास कामाबाबत पूर्ण प्रशिक्षण देण्यात आला आहे. राष्ट्रीय मोहिमेच्या कर्तव्यात असताना, त्यांनाही मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी त्यांना आॅनलाईन पोस्टल मतदान पत्रिका देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
युवा मतदारांसाठी विशेष मोहीम
नव मतदारांचा मतदानाच्या सहभाग वाढविण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात आली. यामुळे नवमतदारांचा आत्मविश्वास वाढेल. लोकशाही बळकट करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. महाविदयालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. यात ३२ हजार मतदारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महिलांचे एक केंद्र असणार
या लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात मतदान अधिकारी पासून ते शिपाई पर्यंत फक्त महिलांच मतदान घेण्यासाठी या केंद्रात असणार आहेत. असा उपक्रम या पहिल्यांदाच होत आहे. मतदानाच्या पाच दिवस आधी मतदान स्लीप देण्यात येणार आहे. यामुळे उपस्थिती कळणार आहे.