उद्योगांना पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही सज्ज; मदतही हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 03:37 PM2020-05-01T15:37:37+5:302020-05-01T15:39:29+5:30

सोलापुरातल्या उद्योजकांच्या भावना; आम्ही लढू. नवे नियोजन करू...!!

We are ready to bring industries to the forefront; Need help too! | उद्योगांना पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही सज्ज; मदतही हवी !

उद्योगांना पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही सज्ज; मदतही हवी !

Next
ठळक मुद्देलॉकडाऊन संपल्यानंतर टेक्स्टाईल उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील राहतीलउद्योग सुरू झाल्यानंतर देश-विदेशातून टेक्स्टाईल उद्योगाला मार्केट असणार की नाही याबाबत येणाºया काळातच माहिती मिळू शकेलभविष्यातील मार्केटवरच टेक्स्टाईल उद्योजक अवलंबून आहेत. उद्योग बंद असल्याने एकूण उलाढाल ठप्प आहे

बाळकृष्ण दोड्डी

 सोलापूर : लॉकडाऊन काळात उद्योगधंदे पूर्णपणे थांबले आहेत. लॉकडाऊन कधी उठेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योग पूर्वपदावर यायला किमान एक वर्षभराचा कालावधी लागेल. आम्ही यातून शंभर टक्के बाहेर पडणे मुश्कील आहे. पण उद्योजक हिंमत हरणार नाहीत. आम्ही लढू. नवे नियोजन करू. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून पुढील काळात उद्योगासाठी मदतीचे धोरण हवे आहे, अशा भावना सोलापुरातील उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.

 लॉकडाऊन नंतर येणाºया अडचणींचा सामना करण्याचा निर्धार सोलापुरातील उद्योजकांनी केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्योजकांनी ह्यलोकमतह्णकडे त्यांचा निर्धार व्यक्त केला आहे. एलएचपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणाले, आमचे पुरवठादार संपूर्ण देशभरात आहेत. या पुरवठादारांवरच आमची उत्पादन प्रक्रिया अवलंबून असते. पुरवठासाखळी सुरळीत होण्यासाठी चांगली वाहतूक व्यवस्था हवी आहे. सप्लाय चेन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच कंपनीत नॉर्मल वर्किंग होण्याकरिता अनेक आव्हाने, अडथळे येतील. यातून आम्ही शंभर टक्के नियोजनरित्या बाहेर पडणे मुश्कील आहे. लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योजकांना बसणार आहे. अनेक उद्योग बंद पडतील. शेकडो उद्योगाची क्षमता कमी होईल. अनेकांच्या नोकºया जातील. उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येण्याकरिता याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून उद्योगाच्या मदतीकरिता धोरण आखणे गरजेचे आहे. सरकारी मदत मिळाल्याशिवाय उद्योग पूर्वपदावर येणार नाही. आमच्या प्रयत्नशीलतेला तसेच नियोजनाला सरकारी मदत अपेक्षित आहे. मदत मिळाल्यास आम्ही शंभर टक्के वर्षभरात बाहेर पडू. आमची तयारी आहे.

बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी सांगतात, सध्या आमचा उद्योग सुरू आहे. लॉक डाऊननंतर उद्योग १00 टक्के पूर्वपदावर येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही लॉकडाऊन नंतरही आवश्यक ती काळजी घेत आहोत. 

फॅक्टरीत फिजिकल डिस्टन्स तसेच नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करणार आहोत. कर्मचाºयांना योग्य समुपदेशन होईल. सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत राहील. तसेच शासनाकडून उद्योगपूरक धोरण आखणे गरजेचे आहे.

कामगारांना नुकसानभरपाई द्यायला उद्योजकांकडे पैसे नाहीत
सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सांगतात, लॉकडाऊन संपल्यानंतर टेक्स्टाईल उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील राहतील. उद्योग सुरू झाल्यानंतर देश-विदेशातून टेक्स्टाईल उद्योगाला मार्केट असणार की नाही याबाबत येणाºया काळातच माहिती मिळू शकेल. भविष्यातील मार्केटवरच टेक्स्टाईल उद्योजक अवलंबून आहेत. उद्योग बंद असल्याने एकूण उलाढाल ठप्प आहे. दीड महिना उद्योग बंद राहिल्याने उद्योजकांचा आर्थिक कणा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टेक्स्टाईल उद्योगात ४0 हजारांहून अधिक कामगार आहेत. या सर्व कामगारांना टेक्स्टाईल उद्योजकांकडून ८ दिवसातून एकदा पाचशे ते हजार रुपये अनामत रक्कम दिली जात आहे. उद्योग सुरळीत झाल्यानंतर दिलेल्या अनामत रकमेची कपात करण्यात येणार आहे. कामगारांना नुकसानभरपाई द्यायला सोलापुरातील उद्योजकांकडे पैसे नाहीत. 

Web Title: We are ready to bring industries to the forefront; Need help too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.