"व्हॅलेंटाईन डे आपणच निर्माण केलंय", पण...; गौतमी पाटील पंढरपुरात दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:52 PM2024-02-14T12:52:46+5:302024-02-14T12:53:21+5:30

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील चांगलीच चर्चेत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तिची माध्यमांत चर्चा होताना दिसून आली नाही.

"We created Valentine's Day", but...; Gautami Patil visited Pandharpur darshan | "व्हॅलेंटाईन डे आपणच निर्माण केलंय", पण...; गौतमी पाटील पंढरपुरात दर्शनाला

"व्हॅलेंटाईन डे आपणच निर्माण केलंय", पण...; गौतमी पाटील पंढरपुरात दर्शनाला

मुंबई/सोलापूर - जगभरात आज १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. आपल्या प्रियजनांना प्रेमाची कबुली देत व्हॅलेटाईन डेच्या शभेच्छा दिल्या जात असून तरुणाईमध्ये आजच्या दिवसाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छांचा आणि शेरोशायरीचा उत्साह दिसून येत आहे. तर, तरुणाईसह प्रेम साजरं करणाऱ्या जोडप्यांसाठी हॉटेल्स आणि पर्यटनठिकाणी काही ऑफर्सही आहेत. बॉलिवूडमध्येही व्हॅलेंटाईनची क्रेझ असून रोमँटींग सिनेमेही पुन्हा प्रदर्शित होत आहेत. त्यातच, नृत्यांगणा गौतमी पाटीलनेही व्हॅलेंटाईन डेवर भाष्य केलं आहे. 

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील चांगलीच चर्चेत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तिची माध्यमांत चर्चा होताना दिसून आली नाही. त्या पार्श्वभूमीवर गौतमी पंढरपुरात आली असता, माध्यम प्रतिनिधींशी तिने संवाद साधला. यावेळी, कामाच्या व्यस्ततेमुळे दौरे सुरू असून आजही जत येथील कार्यक्रमासाठी मी आले होते. तत्पूर्वी पंढरपुरात देवाचं दर्शन घ्यावं म्हणून विठुरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आल्याचं गौतमीने सांगितले. यावेळी, व्हॅलेंटाईन डेसंदर्भातही तिने भाष्य केलं. 

मी देवाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरातील मंदिरात आले आहे. त्यावेळी, येथे मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी देवाचं आज लग्न असल्याचे समजले. व्हॅलेंटाईन डे हे तर आपणच निर्माण केलेलं आहे, पण देवाचं लग्न होतंय हे छान आहे, असे गौतमीने म्हटले. तसेच, सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छाही दिल्या.  

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल प्रश्न विचारला असता माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मात्र, मला राजकारण किंवा या गोष्टींबाबत जास्त काही कळत नाही. मी एक कलाकार आहे, मी कला सादर करते, असेही गौतमीने म्हटले. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असेही तिने म्हटले.  
 

Web Title: "We created Valentine's Day", but...; Gautami Patil visited Pandharpur darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.