नको जात पात हवा आहे विकास.. आशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ
By संताजी शिंदे | Updated: May 1, 2024 18:11 IST2024-05-01T18:09:07+5:302024-05-01T18:11:25+5:30
सोलापूर : जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन नको जात, पात हवा आहे विकास आयटी हब झालाच पाहिजे, अशी ...

नको जात पात हवा आहे विकास.. आशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ
सोलापूर : जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन नको जात, पात हवा आहे विकास आयटी हब झालाच पाहिजे, अशी घोषणा देत कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालया तील विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच केंद्रात बहुमताचे सरकार प्रस्थापित व्हावे म्हणून मतदान पवित्र कर्तव्य आहे. माझ्या एका मतामुळे केंद्रात मजबूत सरकार येणार आहे. म्हणून आम्ही मतदान करणार नको जात पात हवा आहे. विकास म्हणत विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेतली संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, एनएसएस चे कार्यक्रमाधिकारी प्रा. राज शेखर पवार, डॉ शितल भस्मे, प्रा. विद्या वाले, प्रा. विपुल जाधव प्रा. शितल फुटाणे, प्रा. गुरुशांत हपाळे, डॉ. बाळासाहेब पाटील उपस्थित होते