आमचं ठरलंय... वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय उठणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:51+5:302021-03-23T04:23:51+5:30

माळशिरस : सध्या सुरू असलेल्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. यामुळे माळशिरस तालुका भाजप व मित्रपक्षांच्यावतीने माळशिरस शहरातील ...

We have decided ... it will not rise unless the power supply is restored | आमचं ठरलंय... वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय उठणार नाही

आमचं ठरलंय... वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय उठणार नाही

Next

माळशिरस : सध्या सुरू असलेल्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. यामुळे माळशिरस तालुका भाजप व मित्रपक्षांच्यावतीने माळशिरस शहरातील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत केल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही, असा इशारा आमदार राम सातपुते यांनी दिला. तब्बल तीन तासांहून अधिकवेळ सुरु असलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून वीजबिल व वीजपुरवठा खंडित केल्यावरून शेतकरी व महावितरण यांच्यात वाद सुरू आहे. यामध्ये विरोधी बाकावर असणाऱ्या भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. नुकतेच माळशिरस येथे आमदार राम सातपुते व धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना महामारी अशा संकटांच्या काळात शेतकऱ्यांची वीज का तोडता, वीजपुरवठा पूर्ववत झाल्याशिवाय रस्त्यावरून कोणीही बाजूला होणार नसल्याचे आमदार राम सातपुते यांनी सांगितले. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन महावितरणतर्फे देण्यात आले.

यावेळी आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, के. के. पाटील, मिलिंद कुलकर्णी, गणपतराव वाघमोडे, अतुल सरतापे, काकासाहेब मोटे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, सोपान नारनवर, संजय देशमुख, दादासाहेब खरात, संजय मोटे, लक्ष्मण माने आदी मान्यवर उपस्थित होते.

...असे झाले आंदोलन

सकाळी १० वाजता सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन दुपारी १.१५ वाजता संपले. यामुळे पुणे - पंढरपूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘शेतकरीविरोधी ठाकरे सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय’ अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. महावितरणने वीजबिल भरण्याची पॉलिसी तयार करावी, त्यानुसार शेतकरी वीजबिल भरतील, असा विश्वास यावेळी राम सातपुते यांनी दिला.

आम्हाला आनंद वाटत नाही

वीज तोडणी मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांनी शेतकऱ्यांपुढे येत आपल्या भावना मी माझ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी महावितरणला सहकार्य करावे. महावितरण वीजपुरवठा पूर्ववत सुरू करेल. शेतकऱ्यांची वीज तोडताना आम्हाला आनंद वाटत नाही, अशी भावना उपकार्यकारी अभियंता कुंभारे यांनी व्यक्त केली.

Web Title: We have decided ... it will not rise unless the power supply is restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.