ग्रामीण भागातील शिव रस्त्यासाठी जास्तीत जास्त मदत करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:41+5:302021-03-15T04:21:41+5:30
बार्शी : रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन शेत रस्ते गुणवत्तेचे करण्यासाठी नक्कीच मदत केली जाईल. त्यासाठी ...
बार्शी : रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन शेत रस्ते गुणवत्तेचे करण्यासाठी नक्कीच मदत केली जाईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले.
ते लोकसहभागातून होणाऱ्या गुळपोळी-सुर्डी- रस्तापूर या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या शिव रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार सुनील शेरखाने, पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, गटविकास अधिकारी शेखर सावंत, पंचायत समिती सदस्य इंद्रजित चिकणे, ज्येष्ठ नेते कौरव माने, बाजार समिती संचालक बापू शेळके, झेडपी बांधकाम विभागाचे उपअभियंता आयुब शेख, मंडल अधिकारी शरद शिंदे, ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर, विनायक डोईफोडे, बाबा काटे, मालवंडीचे उपसरपंच विष्णू चव्हाण उपस्थित होते.
तहसीलदार सुनील शेरखाने यांनी तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न कमी करण्यावर भर राहणार असल्याची हमी दिली.
प्रास्ताविकात इंद्रजित चिकने यांनी या रस्त्यासाठी लोकसहभाग कशा पद्धतीने उपलब्ध केला याची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती इंद्रजित चिकणे, महादेव चिकणे, माजी सरपंच दत्ता काळे, गौतम चिकने, गोविंद चिकने, गणेश चिकने, अक्षय सावंत, विशाल भोसले, किशोर भोसले, किशोर चिकणे, नागेश शिंदे, भैरवनाथ बारवकर, शहाजी चिकणे, महेश चिकणे, औदुंबर सावंत, स्वप्नील चिकणे यांनी परिश्रम घेतले.
----
१४ गुळपोळी
गुळपोळी-सुर्डी- रस्तापूर मार्गाचा शुभारंभ करताना आमदार राजेंद्र राऊत