भटक्या विमुक्त जाती जमातीच्या घटकांसाठी असणाऱ्या शासकीय योजना, फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:40+5:302021-02-05T06:50:40+5:30
बार्शी : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. समाजातील अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न व त्यांचे ...
बार्शी : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. समाजातील अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न व त्यांचे हक्क सरकारकडून मिळवून देण्यासाठी शासनाकडे भटक्या विमुक्त जाती जमाती कल्याण समितीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती संधी मिळाली आहे. या घटकांसाठी असणाऱ्या शासकीय योजना व त्यांचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्याबद्दल बार्शी शहर व तालुक्यातील भटक्या विमुक्त जमातीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ व समाज मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
मेळाव्याच्या प्रारंभी आमदार राजेंद्र राऊत यांचे धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य ढोल, गोंधळी समाजाचे वाद्य संबूळ व हलगीच्या नादात त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, भारत पवार, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, समाजाचे राज्य सचिव नागनाथ अडसूळ, अंबॠषी कोळेकर, भोला अडसूळ, संजय चव्हाण, सोनलताई होनमाने, मंगलताई देशमुख, सुनीता काळे, मीना काळे, राजू काळे, रंजेश मुसळे, प्रमोद गोणेकर, कृष्णा उपळकर, अनिल पवार, भगवान काळे, बालाजी अंधारे उपस्थित होते.
---
फोटो : ३१ राजा राऊत
आमदार राजाभाऊ राऊत याचा सत्कार करताना समाजाचे राज्यसचिव नागनाथ अडसूळ, नगराध्यक्ष आसीफभाई तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, भोला अडसूळ.