सीमावर्ती भागातील गावांना विशेष सहकार्य करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:40+5:302021-01-08T05:10:40+5:30

बऱ्हाणपूर : कर्नाटक सरकारच्या गडी अभिवृद्धी प्राधिकाराने आजपर्यंत सीमावर्ती भागात सहकार्य करीत आहे. यापुढे प्राधिकरण कर्नाटकाच्या बाहेरील सीमावर्ती कन्नड ...

We will extend special cooperation to the border villages | सीमावर्ती भागातील गावांना विशेष सहकार्य करू

सीमावर्ती भागातील गावांना विशेष सहकार्य करू

Next

बऱ्हाणपूर : कर्नाटक सरकारच्या गडी अभिवृद्धी प्राधिकाराने आजपर्यंत सीमावर्ती भागात सहकार्य करीत आहे. यापुढे प्राधिकरण कर्नाटकाच्या बाहेरील सीमावर्ती कन्नड भागात जास्त सहकार्य करणार, असे मत गडी अभिवृद्धी प्राधिकाराचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर यांनी व्यक्त केले.

आदर्श कन्नड बळग महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने गडी अभिवृद्धी प्राधिकाराचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सीमावर्ती कन्नड लोकांच्या समस्यांबद्दल निवेदन देण्यात आले. दरम्यान, त्यांनी वरील मत व्यक्त केले.

सोलापूर, अक्कलकोट, सांगली, जत आणि गडहिंग्लज भागांत दौरा करून विशेष क्रियायोजना अमलात आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी गडी अभिवृद्धी प्राधिकाराचे सचिव प्रकाश मत्तीहळ्ळी, आदर्श कन्नड बळगचे अध्यक्ष मलिकजान शेख, सचिव सोमशेखर जमशेट्टी, कार्याध्यक्ष गिरीश जकापुरे व प्रकाश शिवणगी आदी उपस्थित होते.

--

कन्नड शाळांना सहकार्य मिळत नसल्याची खंत

सरकारचे कन्नड आणि संस्कृती मंत्रालय, कन्नड अभिवृद्धी प्राधिकार, गडी अभिवृद्धी प्राधिकारकडून महाराष्ट्रातील कन्नड शाळांना विशेष सहकार मिळत नाही. शाळेत भौतिक आणि तंत्रज्ञान साहित्य कमी आहे, तर शाळा विकासासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी आदर्श कन्नड बळगचे महाराष्ट्र अध्यक्ष मलिकजान शेख यांनी केली.

--

फोटो : ०५ बऱ्हाणपूर

बंगळुरू येथे गडी अभिवृद्धी प्राधिकाराचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर यांचा सत्कार करताना आदर्श कन्नड बळगचे पदाधिकारी.

Web Title: We will extend special cooperation to the border villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.