मंगळवेढा नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देऊ : अभिजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:30+5:302021-03-06T04:21:30+5:30
मंगळवेढा व परिसरात डिसेंबर १६६५ साली छत्रपती शिवाजी महाराज येथे २५ दिवस वास्तव्य होते. ही येथील नागरिकांसाठी अभिमानाची बाब ...
मंगळवेढा व परिसरात डिसेंबर १६६५ साली छत्रपती शिवाजी महाराज येथे २५ दिवस वास्तव्य होते. ही येथील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे येथे पुतळा असायला हवा, या विचारातून अभिजित पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला.
गेल्या २५ वर्षांपासून होत असलेल्या शिवभक्तांच्या मागणीचा विचार कुणाकडूनच होत नव्हता. त्यानंतर, मंगळवेढेकरांनी यासंबंधी सुरू केलेली सह्यांची मोहीम सुरू केली होती. त्याबद्दल पाटील यांनी पुतळा बसवण्यासाठी काय अडचण आहे, याची माहिती नगरपालिकेकडून जाणून घेतली. त्यानंतर, एक शिवभक्त म्हणून अश्वारूढ पुतळा बसवण्याची तयारी अभिजित पाटील यांनी दर्शवली आहे.
त्यासाठी लागणारी जागा आणि परवानगी मिळावी, यासाठी तहसीलदार, नगराध्यक्ष, नगरपालिका मुख्याधिकारी निशिकांत पंरचडराव, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती मंडळ यांच्याकडे अभिजित पाटील यांनी निवेदन दिले आहे.