पंढरपूर एमआयडीसीसाठी प्राधान्याने विचार करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:25 AM2021-09-23T04:25:01+5:302021-09-23T04:25:01+5:30
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पुणे येथे भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ...
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पुणे येथे भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागातर्फे विदर्भ, मराठवाडा, खान्देश जिल्ह्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सादर केला. यावेळी सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, विठ्ठलचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, विठ्ठल सूतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील, विलास देठे, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष कल्याण कुसमडे उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्याला जोडणारे जवळपास सर्वच रस्ते आता चांगल्या पद्धतीने तयार झाले आहेत. उद्योग, व्यवसाय वाढीसाठी सर्व कच्चा माल, पूरक वातावरण असल्याने पंढरपूर तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करावी, आशी मागणी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना हक्कांचा रोजगार मिळणार आहे. तर अनेक नव्या उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, अशी मागणी केली. त्यावर खा. शरद पवार यांनी यामध्ये आपण लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने विचार करणार असल्याचे आश्वासन दिले. लवकरच त्याचे सर्वेक्षणही केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
फोटो :::::::::::::::::
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना कार्य अहवाल सादर करताना उद्योग, व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, कल्याणराव काळे आदी.