महामार्ग बाधितांना लवकरच मोबदला मिळवून देऊ : शंभरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:52+5:302020-12-14T04:34:52+5:30
मंगळवेढ्यातील बाधित शेतकऱ्यांनी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ...
मंगळवेढ्यातील बाधित शेतकऱ्यांनी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मारुती वाकडे, भारत दत्तू, सत्तार खतीब, अशोक चेळेकर, ज्ञानेश्वर कोंडुभैरी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी ॲड. पवार यांनी मंगळवेढा प्रांत कार्यालयामध्ये बाधित शेतकऱ्यांकडून २१ डिसेंबर २०२० रोजी रस्त्याचे काम बंद करण्याचे निवेदन दिले. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा येथील बाधित शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले आहे. काही शेतकऱ्यांकडून जमिनीचा मोबदला देऊन हायवे ॲथॉरिटीने ताबा घेतला नसून बेकायदेशीर काम सुरू आहे. काझीने दिलेल्या अर्जात कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीसंदर्भात स्पष्ट उल्लेख नसताना प्रांताधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले आहे. अशा विविध तक्रारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
यावेळी जावेद खतीब, प्रवीण हजारे, राजाराम सूर्यवंशी, विजय बुरकूल, जनार्धन कोंडूभैरी, रतीलाल दत्तू, बाळू मुजावर, सुधीर गवळी, दादा गुंगे, शिवाजी वाकडे, ईश्वर वाकडे, जयराज शेंबडे, जनार्धन कोंडूभैरी, दिलावर मुजावर, जनार्धन डोरले, सुधीर जाधव, यतिराज मर्दा, अरुण दत्तू, अण्णा दत्तू, गजानन हजारे यांच्यासह गणेशवाडी, आंधळगाव, माचणूर, मंगळवेढ्याचे शेतकरी उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::::::
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून कागदपत्रांची तपासणी केली. याबाबत उच्च न्यायालयात १५ डिसेंबरला तारीख आहे. महसूलमंत्री यांच्याकडील कामकाजही लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
- ॲड. नंदकुमार पवार
अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी