आमच्यासोबत जो निवडणुकीत नसेल उसको हम पटक देंगे; अमित शहा यांच्यानंतर रावसाहेब दानवेंचा शिवसेनेला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 03:01 PM2019-01-16T15:01:27+5:302019-01-16T15:05:49+5:30

शिवसेनेसोबत युती व्हावी असा आमचा आणि आमच्या पदाधिका-यांचा प्रयत्न आहे.

We will strike the election which is not with us; After Amit Shah, the message of Shiv Sena of Raosaheb Dynavena | आमच्यासोबत जो निवडणुकीत नसेल उसको हम पटक देंगे; अमित शहा यांच्यानंतर रावसाहेब दानवेंचा शिवसेनेला इशारा 

आमच्यासोबत जो निवडणुकीत नसेल उसको हम पटक देंगे; अमित शहा यांच्यानंतर रावसाहेब दानवेंचा शिवसेनेला इशारा 

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लातूरच्या सभेत शिवसेनेला पटक देंगे असा इशारा दिलामतांचे विभाजन टाळले पाहिजे. कारण तसे न झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल - दानवे

सोलापूर : शिवसेनेसोबत युती व्हावी असा आमचा आणि आमच्या पदाधिका-यांचा प्रयत्न आहे. समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. मतांचे विभाजन टाळले पाहिजे. कारण तसे न झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल. पण निवडणुकीत जो आमच्यासोबत येईल त्याच्यासह आणि जो आमच्यासोबत नसेल उसको हम पटक देंगे, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी सोलापुरात दिला. 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लातूरच्या सभेत शिवसेनेला पटक देंगे असा इशारा दिला होता. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी वरील खुलासा केला. निवडणुका जवळ येतील, तसे चित्र स्पष्ट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कडवट टीका करीत आहेत. याबद्दल विचारले असता दानवे म्हणाले, एवढ्या मोठ्या पदावर असणाºया व्यक्तीबद्दल असे बोलू नये. पण ते बोलत आहेत हे चुकीचे आहे. 

Web Title: We will strike the election which is not with us; After Amit Shah, the message of Shiv Sena of Raosaheb Dynavena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.