उजनी धरणातील गाळ काढण्याच्या निविदेवर दीड महिन्यात निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन

By राकेश कदम | Published: March 17, 2023 01:18 PM2023-03-17T13:18:07+5:302023-03-17T13:18:28+5:30

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न 

We will take a decision on the tender for removal of silt from Ujani Dam in one and a half months devendra Fadnavis assured vidhan parishad | उजनी धरणातील गाळ काढण्याच्या निविदेवर दीड महिन्यात निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन

उजनी धरणातील गाळ काढण्याच्या निविदेवर दीड महिन्यात निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन

googlenewsNext

उजनी धरणातील गाळ ही मोठी संपत्ती आहे. धरणातील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेवर पुढील एक ते दीड महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.

भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. हा गाळ मोठी संपत्ती आहे. वाळू मिश्रित गाळ काढला तर आणखी सहा टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याच्या सिंचनासाठी उपलब्ध होईल. राज्य शासन या विषयावर काय करणार, असे मोहिते पाटील यांनी विचारले.

यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये धरणातील गाळ काढण्याची निविदा काढण्यात आली होती. यासाठी आलेले दर देशातील इतर भागांपेक्षा खूप जास्त होते. दीड महिन्यात यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवू.

Web Title: We will take a decision on the tender for removal of silt from Ujani Dam in one and a half months devendra Fadnavis assured vidhan parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.