पंढरपूरच्या विठ्ठलाला उबदार कपड्याचा पोशाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:32 PM2018-12-02T12:32:26+5:302018-12-02T12:38:23+5:30
पंढरपूर : थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी सामान्य माणसाप्रमाणे श्री विठ्ठलाला देखील ऊबदार कपड्याचा पोषाख परिधान करण्यात आला आहे. सध्या ...
ठळक मुद्देराज्यात कडाक्याची थंडी सुरूविठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी
पंढरपूर : थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी सामान्य माणसाप्रमाणे श्री विठ्ठलाला देखील ऊबदार कपड्याचा पोषाख परिधान करण्यात आला आहे.
सध्या राज्यात कडाक्याची थंडी सुरू आहे. यामुळे अनेकजण थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी ऊबदार कपड्याचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मातीस थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून रजाई, शाल, मोफलर व कानपट्टी असा पोशाख परिधान केला आहे. विठ्ठलाला हा पोषाख २८ नोव्हेंबर २०१८ पासून रोज रात्री १२ वाजून ८ मिनिटांनी घालण्यात येत आहेत. माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.